October Eclipse : वर्षातील शेवटचं सूर्य आणि चंद्रग्रहण अतिशय खास, या राशींना मिळणार पैसाच पैसा

ग्रहण ही एक खगोलीय घटना आहे. मात्र ज्योतिषशास्त्रातही याला अन्यन साधारण महत्त्व आहे. ज्योतिषशास्त्रात ग्रहण हे अशुभ मानले जाते. या वर्षातील शेवटचं सूर्य आणि चंद्रग्रहण लवकरच होणार आहे. 

Oct 03, 2023, 18:49 PM IST

Solar and Lunar Eclipse in 2023 : ग्रहण ही एक खगोलीय घटना आहे. मात्र ज्योतिषशास्त्रातही याला अन्यन साधारण महत्त्व आहे. ज्योतिषशास्त्रात ग्रहण हे अशुभ मानले जाते. या वर्षातील शेवटचं सूर्य आणि चंद्रग्रहण लवकरच होणार आहे. 

1/7

ऑक्टोबर महिना ग्रह गोचर आणि ग्रहणाच्या दृष्टिकोनातून महत्त्वाचा आहे. या वर्षातील शेवटचा चंद्रग्रहण आणि सूर्यग्रहण या महिन्यात होणार आहे. 

2/7

सूर्यग्रहण आणि चंद्रग्रहणाचा मानवी जीवनावर मोठा प्रभाव दिसून येणार आहे. सूर्यग्रहण 14 ऑक्टोबरला  रात्री 8.34 वाजेपासून 02.25 पर्यंत असेल. 

3/7

तर चंद्रग्रहण हे 29 ऑक्टोबरला दुपारी 01.06 वाजेपासून मध्यरात्री 2.22 वाजेपर्यंत असणार आहे.   

4/7

सूर्यग्रहण हे अमावस्येला तर चंद्रग्रहण हे पौर्णिमेला होमार आहे. काही राशींसाठी ग्रहण भाग्यशाली ठरणार आहे. 

5/7

तूळ राशीच्या लोकांना दोन्ही ग्रहणांचे शुभ परिणाम दिसून येणार आहे. प्रलंबित कामे सहज पूर्ण होणार आहे. या काळात तुम्हाला अचानक कुठूनतरी धनलाभ होणार आहे. त्याचबरोबर अनेक चांगल्या बातम्या तुम्हाला मिळणार आहेत. 

6/7

मिथुन राशीच्या लोकांसाठी सकारात्मक असणार आहे. हे दोन्ही ग्रहण नोकरदारांसाठी खूप भाग्यशाली ठरणार आहे. पदोन्नतीची चांगली बातमी मिळेल. आर्थिक लाभ होणार आहे. व्यावसायिकांसाठी हा काळ अतिशय फलदायी आहे. 

7/7

सिंह राशीच्या लोकांसाठी सूर्य आणि चंद्रग्रहण नशीबाची साथ देणारा ठरणार आहे. तुमची बिघडलेली कामं पुन्हा मार्गी लागणार आहे. ऑफिसमध्ये तुम्हाला मोठी जबाबदारी मिळणार आहे. (Disclaimer - या ठिकाणी दिलेली माहिती ज्योतिष शास्त्रावर आधारित असून ती केवळ माहितीसाठी दिली जात आहे. झी 24 तास या गोष्टींना दुजोरा देत नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी संबंधित विषयातील तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्या.)