लैंगिक अत्याचार केल्यानंतर पीडितेला मेसेज करुन म्हणाला, 'I Love R*ping You, तुला जितकं हे...'

Serious Allegations Against Social Media Influencer: या प्रसिद्ध सोशल मीडिया इन्फ्युएन्सरवर गंभीर आरोप करण्यात आले असून सध्या त्याला नजरकैदेत ठेवण्यात आलं आहे. दोन महिलांनी त्याच्यावर फारच धक्कादायक आरोप केलेत. नेमकं हे प्रकरण काय आहे पाहूयात...

Swapnil Ghangale | Sep 17, 2024, 15:33 PM IST
1/11

andrewtate

दोन ब्रिटीश महिलांनी वादग्रस्त सोशल मिडिया इन्फ्युएन्सर अँड्र्यू टेटवर गंभीर आरोप केले आहेत. बीसीसीने दिलेल्या वृत्तानुसार, या महिलांनी अँड्र्यूज टेटवर बलात्कार तसेच 'गळा दाबून मारुन टाकण्याचा प्रयत्न केला' असे आरोप केले आहेत. 

2/11

andrewtate

अँड्र्यू टेट आणि त्याचा भाऊ ट्रीस्टन या दोघांविरुद्ध मानवी तस्करी आणि लैंगिक छळ केल्याप्रकरणी गुन्हे दाखल करण्यात आला आहेत. रोमानियामध्ये हे गु्न्हे दाखल करण्यात आले असून गुन्हा सिद्ध झाल्यास या दोघांना 10 वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा होऊ शकते. या दोघांनीही त्यांच्याविरोधातील आरोप फोटाळून लावले आहेत. 

3/11

andrewtate

अँड्र्यू टेटला सध्या रोमानियामधील त्याच्या राहत्या घरातच नजर कैदेत ठेवलं आहे. त्याची याच ठिकाणी अनेक प्रकरणांसंदर्भात चौकशी सुरु आहे. यामध्ये अल्पवयीन मुलींबरोबर लैंगिक संबंध ठेवणे तसेच अल्पवयीन व्यक्तींची मानवी तस्करी करण्यासारख्या गंभीर गुन्ह्यांचा समावेश आहे. 

4/11

andrewtate

अँड्र्यू टेट आणि त्याच्या भावावर करण्यात आलेल्या आरोपांना दुजोरा देणारे जबाब दोन महिलांनी नोंदवले आहेत. रोमानियामधील प्रकरणात तपास सुरु होण्याआधी अँड्र्यू टेट आणि त्यांच्या भावाने युनायटेड किंग्डममध्ये आमच्यावर बलात्कार करुन जीवे मारण्याचा प्रयत्न केला होता, असा आरोप दोन ब्रिटीश महिलांनी केला आहे.

5/11

andrewtate

पीडितांपैकी एका महिलेने, आपण 2013 मध्ये अँड्र्यू टेटला डेट करत होतो असं सांगितलं आहे. आपल्यावर बलात्कार करण्यापूर्वी अँड्र्यू टेटने आपल्याला धमकावलं होतं, असं या महिलेचं म्हणणं आहे. "तो माझ्याकडे पाहून मला म्हणाला की, मी चर्चा करतोय की मी तुझा बलात्कार करावा की नाही," असं पीडितेने बीबीसीला दिलेल्या माहितीमध्ये सांगितलं.

6/11

andrewtate

नंतर अँड्र्यू टेटने या महिलेला तुझ्यावर अत्याचार करताना आनंद झाला असा धक्कादायक मेसेज केला होता. "तुला जितकं हे आवडणार नाही तितका मला याचा आनंद होईल," असं अँड्र्यू टेटने व्हॉइस नोट मेसेजमध्ये या पीडितेला सांगितलं होतं. त्याने तिला मेसेजही केला होता. त्याने मेसेजमध्ये, "I Love Raping You" म्हणजेच 'तुझ्यावर बलात्कार करायला आवडतं' असं अँड्र्यू टेटने म्हटल्याचं पीडितेचं म्हणणं आहे.

7/11

andrewtate

अन्य एका महिलेने आपण अँड्र्यू टेटला 2014 मध्ये भेटलो होतो असं सांगताना तिच्याबरोबर घडलेला प्रकार कथन केला आहे. लैंगिक संबंध ठेवताना अँड्र्यू टेटने माझा गळा दाबून मला बेशुद्ध केलं होतं, असा आरोप या दुसऱ्या पीडितेने केला आहे. 

8/11

andrewtate

"या प्रकाराने मी भयभीत झाले होते. मी मोठमोठ्याने श्वास घेत होते इतकेच मला आठवतेय. तो एक बालात्कारच होता," असं पाडितेने बीसीसीला सांगितलं. तसेच मी शुद्धीवर आल्यानंतरही तो माझ्यावर बलात्कार करत होता, असं अँड्र्यू टेटवर आरोप करणाऱ्या महिलेने म्हटलं आहे.

9/11

andrewtate

अँड्र्यू टेटने कथितरित्या अत्याचार केल्यानंतर सकाळी  या पीडितेला जाग आली तेव्हा तिचे डोळे लाल झाले होते. डोळ्यात रक्त साकोळलं होतं. गळा दाबण्याचा प्रयत्न करण्यात आल्याचा हा पुरावा होता. या पीडितेच्या मित्रानेही तिने त्याला घटनाक्रम सांगितला होता याबद्दलचा खुलासा केला आहे.

10/11

andrewtate

या दोन महिलांबरोबरच इतरही अनेक महिलांनी अँड्र्यू टेटविरुद्ध अशाच प्रकारचे आरोप केले आहेत. अँड्र्यू टेट गोड बोलून मुलींना आपल्या प्रेमाच्या जाळ्यात ओढायचा. सध्या अँड्र्यू टेट आणि त्याच्या भावाविरुद्ध रोमानियामध्ये कायदेशीर कारवाई सुरु आहे. या दोघांनी लैंगिक छळ करण्याच्या उद्देशाने मानवी तस्करी केल्याचाही आरोप आहे.

11/11

andrewtate

मात्र एवढ्या आरोपांनंतरही अँड्र्यू टेटने सर्व आरोप फेटाळून लावत आपण कधीच कोणाला दुखावलेलं नाही असं म्हटलं आहे. 2023 साली बीबीसीला दिलेल्या मुलाखतीमध्ये अँड्र्यू टेटने परस्पर संमतीशिवाय कधीच लैंगिक संबंध ठेवलेले नाहीत, असा दावा केला होता. (सर्व फोटो इन्स्टाग्रामवरुन साभार)