PHOTO: Skoda ची सर्वात स्वस्त ऑटोमॅटिक SUV कार लाँच; अडल्ट आणि चाईल्ड सेफ्टीमध्ये 5-स्टार रेटिंग

Skoda Kushaq Onyx Specification and Features:  आघाडीची ऑटोमोबाईल कंपनी Skoda ने आपली नवी कार भारतीय बाजारपेठेत लाँच केली आहे. या ऑटोमॅटिक कारमध्ये आधुनिक सेफ्टी फिचर्स देण्यात आले आहेत. सेफ्टीच्या बाबतीत या कारला  5-स्टार रेटिंग मिळाले. जाणून घेऊया Skoda Kushaq Onyx SUV कारचे बेस्ट फिचर्स. 

वनिता कांबळे | Jun 12, 2024, 15:00 PM IST
1/7

Skoda Kushaq Onyx

Skoda कंपनीने आपली नवी Skoda Kushaq Onyx ही SUV कार भारतात लाँच केली आहे. स्कोडाची ही  सर्वात स्वस्त ऑटोमॅटिक SUV कार आहे. 

2/7

स्टार्टिंग प्राईज

Active आणि Ambition अशा दोन व्हेरियंटमध्ये ही कार लाँच करण्यात आलेय. या कारची स्टार्टिंग प्राईज 13.49 लाख इतकी आहे.   

3/7

चाईल्ड सेफ्टी

 2022 मध्ये या कारची क्रॅश टेस्ट  झाली होती. यात अडल्ट सेफ्टीत 34 गुणांपैकी 29.64 गुण आणि चाईल्ड सेफ्टीत 49 पैकी 42 गुण मिळाले. 

4/7

6-स्पीड टॉर्क कन्व्हर्टर

या कारमध्ये 6-स्पीड टॉर्क कन्व्हर्टर ऑटोमॅटिक ट्रांसमिशन गिअरबॉक्स आहे. 

5/7

इंजिन

 इंजिन  115Ps पॉवर आणि 178Nm टॉर्क जनरेट करते. भारतीय ग्राहकांना लक्षात घेऊन  ही कार तयार करण्यात आलेय.   

6/7

पॉवर आणि परफॉर्मन्स

पॉवर आणि परफॉर्मन्सच्या बाबतीतदेखील ही कार अत्यंत दमदार आहे. या कारमध्ये 1.0 लिटर क्षमतेचे 3 सिलेंडर टर्बो-पेट्रोल TSI इंजिन वापरले आहे.  

7/7

5-स्टार रेटिंग

Skoda Kushaq Onyx या SUV कारला अडल्ट आणि चाईल्ड सेफ्टीमध्ये 5-स्टार रेटिंग मिळाले आहे.