SIP करणाऱ्यांसाठी 11 स्मार्ट टिप्स, कमी गुंतवणुकीवरही मिळतील सर्वाधिक रिटर्न्स

| May 24, 2024, 19:40 PM IST
1/12

SIP करणाऱ्यांसाठी 11 स्मार्ट टिप्स, गुंतवणुकीवर मिळतील सर्वाधिक रिटर्न्स

SIP smart tips Personal Investment Financial Tips for maximum returns Marathi News

SIP investment Tips: देशात एसआयपी करणाऱ्या गुंतवणूकदारांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. जर तुम्ही SIP च्या माध्यमातून म्युच्युअल फंडातही गुंतवणूक करत असाल तर काही गोष्टी लक्षात ठेवल्यात तर तुम्ही केलेल्या गुंतवणुकीवर तुम्हाला जास्त परतावा मिळवू शकतो. अशा 11 टिप्स खास तुमच्यासाठी..

2/12

फंड हिस्ट्री

SIP smart tips Personal Investment Financial Tips for maximum returns Marathi News

कोणत्याही म्युच्युअल फंडात एसआयपी सुरू करण्यापूर्वी फंडाच्या आधीच्या कामगिरीचे मूल्यमापन करा. दीर्घ कालावधीत सातत्याने चांगली कामगिरी करणाऱ्या फंडांमध्येच गुंतवणूक करा. 

3/12

एक्सपेंस रेशियो

SIP smart tips Personal Investment Financial Tips for maximum returns Marathi News

गुंतवणूक करताना म्युच्युअल फंडाकडून आकारले जाणारे हे शुल्क महत्वाचे असते. ज्यांचा एक्सपेंस रेशियो कमी असेल असे फंड निवडा. 

4/12

फंड मॅनेजरचा ट्रॅक रेकॉर्ड

SIP smart tips Personal Investment Financial Tips for maximum returns Marathi News

फंड मॅनेजरचा अनुभव आणि कौशल्य पाहा. याचा परिणाम फंडाच्या कामगिरीवर पडत असतो. त्यामुळे फंड मॅनेजरचा ट्रॅक रेकॉर्ड नक्कीच तपासा. 

5/12

डायवर्सिफिकेशन

SIP smart tips Personal Investment Financial Tips for maximum returns Marathi News

जोखीम कमी करण्यासाठी निधी योग्यरित्या वैविध्यपूर्ण आहे याची खात्री करा.

6/12

शिस्तबद्ध पद्धतीने गुंतवणूक

SIP smart tips Personal Investment Financial Tips for maximum returns Marathi News

शिस्तबद्ध पद्धतीने गुंतवणूक करण्याची सवय लावा. दीर्घकालीन आर्थिक उद्दिष्टे साध्य करण्यासाठी हे आवश्यक आहे.

7/12

आर्थिक उद्दिष्टे निश्चित करा

SIP smart tips Personal Investment Financial Tips for maximum returns Marathi News

SIP सुरू करण्यापूर्वी तुमची आर्थिक उद्दिष्टे ठरवा. कमी कालावधीसाठी, जास्त कालावधीसाठी, आपत्कालासाठी असे फंड तयार ठेवा.

8/12

योग्य फंडची निवड

SIP smart tips Personal Investment Financial Tips for maximum returns Marathi News

जोखीम घ्यायची तयारी आणि आर्थिक उद्दिष्टांशी जुळेल असा योग्य म्युच्युअल फंड निवडा. वेगवेगळ्या फंडचे जोखमीचे स्तरही वेगवेगळे असतात. त्यामुळे योग्य फंडाची निवड करणे महत्त्वाचे आहे. 

9/12

ऑटो-डेबिट पर्याय

SIP smart tips Personal Investment Financial Tips for maximum returns Marathi News

शिस्तबद्ध गुंतवणुकीसाठी, ऑटो-डेबिट मोड वापरा. ज्यामध्ये नियोजित तारखेला बँक खात्यातून एसआयपी रक्कम कापली जाते.

10/12

रिइन्व्हेस्टमेंट

SIP smart tips Personal Investment Financial Tips for maximum returns Marathi News

वेळोवेळी तुमचा पोर्टफोलिओ तपासा. कमी रिटर्न्स देणारे फंडची चाचपणी करा. त्यामुळे जास्त परतावा मिळण्यास मदत होईल. 

11/12

भावनिक गुंतवणूक नको

SIP smart tips Personal Investment Financial Tips for maximum returns Marathi News

बाजारात अस्थिरता आणि चढ-उतार येत असतात. अशावेळी गुंतवणूकदारांनी भावनांच्या आहारी जाऊन निर्णय घेऊ नका.बाजारातील वातावरणाची पर्वा न करता गुंतवणूक करत राहा.

12/12

SIP ची रक्कम वाढवा

SIP smart tips Personal Investment Financial Tips for maximum returns Marathi News

उत्पन्न वाढले की एसआयपीची रक्कम वाढवा. त्यामुळे मोठा निधी निर्माण होण्यास मदत होते.