...तर 10 हजाराचे होतील 1.5 कोटी रुपये! समजून घ्या SIP चा 10X20X15 Formula

10X20X15 Formula for SIP: गुंतवणुकीबद्दल आपण विचार करतो तेव्हा आपल्यासमोर अनेक पर्याय उपलब्ध आहेत. मात्र या साऱ्यामध्ये सिस्टीमॅटिक इनव्हेसमेंट प्लॅन म्हणजेच एसआयपीचा पर्याय सर्वोत्तम असतो असं म्हटलं तर वावगणं ठरणार नाही. हल्ली एसआयपीच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात गुंतवणूक केली जाते. याचसंदर्भात जाणून घेऊयात...

| Sep 11, 2024, 08:00 AM IST
1/11

 sipinvest

गुंतवणूक करण्याचा विचार करताना छोट्या छोट्या टप्प्यातून मोठं लक्ष्य काठता येतं हे अनेकांना लक्षात येत नाही. एसआयपीच्या माध्यमातून गुंतवणूक करताना ही गोष्ट कशी परिणामकारक ठरते हे आपण पाहूयात...

2/11

 sipinvest

दिर्घकालीन गुंतवणुकीचा विचार करत असाल तर तुम्ही एसआयपीचा नक्कीच विचार केला पाहिजे. कारण एसआयपीचा सर्वात मोठा लाभ म्हणजे यामध्ये चक्रवाढ पद्धतीने नफा मिळतो.  

3/11

 sipinvest

एसआयपीमध्ये सरासरी 15 टक्के परतावा मिळतो असं ग्राह्य धरलं जातं. इतर कोणत्याही गुंतवणुकीपेक्षा हा परताव्याचा दर स्थिर आणि विश्वासार्ह आहे, असं म्हणता येईल.  

4/11

 sipinvest

एसआयपीमध्ये किती काळासाठी आणि किती रक्कमेची गुंतवणूक करावी हे गुंतवणूकदारावर अवलंबून असतं. हे गुंतवणूकदारांना फारच सोयीचं ठरतं.  

5/11

 sipinvest

विशेष म्हणजे तुम्ही एसआयपीमध्येच थांबवू शकता, त्यामधील पैसे काढून घेऊ शकता किंवा त्यामधील गुंतवणूक वाढवू शकता. मात्र या माध्यमातून तुम्हाला कोट्याधीश व्हायचं असेल तर 10X20X15 हा फॉर्म्युला लक्षात ठेवला पाहिजे. हा नेमका काय फॉर्म्युला आहे पाहूयात...

6/11

 sipinvest

थोडे थोडे पैसे बाजूला काढून मोठी रक्कम जमा करणाऱ्यांपैकी तुम्ही असाल तर तुम्हाला एसआयपीसारखी गोष्टी फार फायद्याची ठरु शकते. तसेच तुम्ही म्युच्यूअल फंडाचा विचार करत असाल तर तुम्ही  10X20X15 हा फॉर्म्युला वापरुन 20 वर्षांमध्ये कोट्याधीश बनू शकता.

7/11

 sipinvest

10X20X15 फॉर्म्युलाबद्दल सांगायचं झालं तर कोणतीही एसआयपीमधील गुंतवणूक सुरु करुन ती किमान 20 वर्षांसाठी सुरु ठेवण हे या सूत्राचं मूळ आहे. या सुत्रामधील 10 हा आकडा 10 हजार रुपये दर्शवतो. ही दर महिन्याला एसआय़पीअंतर्गत गुंतवणूक करायची रक्कम आहे. सूत्रामधील 20 हा कालावधी आहे. तर यामधील शेवटचा आकडा 15 हा वार्षिक सरासरी परताव्याची टक्केवारी आहे.  

8/11

 sipinvest

आता या फॉर्म्युलानुसार तुम्ही महिन्याला 10 हजार रुपये अशा हिशोबाने 20 वर्ष पैसे बाजूला काढले तर तुमची निव्वळ गुंतवणूकच 24 लाख रुपये इतकी होती.  

9/11

 sipinvest

सरासरी 15 टक्के परतावा ग्राह्य धरला तर तरी तुमच्या या गुंतवणुकीमधून तुम्हाला 1 कोटी 27 लाख 59 हजार 550 रुपये लाँग टर्म कॅपिटल गेन्स म्हणून 20 वर्षात परत मिळतील.  

10/11

 sipinvest

मूळ गुंतवणूक आणि त्यावर मिळालेले व्याज असा हिशोब केल्यास एकूण 1 कोटी 51 लाख 59 हजार 550 रुपये परतावा मिळेल.  

11/11

 sipinvest

म्हणजेच तुम्ही 10X20X15 फॉर्म्युलानुसार 20 वर्षांमध्ये दीड कोटींचे मालक बनू शकता.