Shukra Vakri मुळे आजपासून काही राशींचे अच्छे दिन! तर काहींवर कोसळणार संकट

Shukra Vakri : संपत्तीचा कारक शुक्र वक्री स्थितीत आला आहे. आज सकाळी 6.01 वाजता शुक्र ग्रहाने सिंह राशीत प्रवेश केला आहे. त्यामुळे काही राशींचे अच्छे दिन तर काही राशींवर संकट कोसळणार आहे. 

Jul 23, 2023, 13:34 PM IST

Shukra Vakri : वैदिक ज्योतिषशास्त्रानुसार संपत्ती, विलास, प्रेम आणि सौंदर्याचा कारक शुक्र ग्रहाने आपली स्थिती बदलली आहे. आज सकाळी 6.01 वाजता शुक्र सिंह राशीत प्रवेश केला आहे. शुक्र सिंह राशीत 7 ऑगस्ट 2023 पर्यंत असणार आहे. 

1/9

शुक्र वक्री

त्यामुळे पुढील 42 दिवस काही राशींसाठी अच्छे दिन तर काही राशींवर संकट कोसळणार आहे. चला तर मग जाणून घेऊयात तुमच्यावर काय परिणाम होणार आहे ते...

2/9

या राशींवर कोसळणार संकट! मिथुन (Gemini)

भविष्यात या लोकांना अनेक अडचणींचा सामना करावा लागणार आहे. आर्थिक फटका बसण्याची शक्यता आहे. पैसे गुंतवणूक करताना सावध राहा. आर्थिक बाबात निर्णय घेताना शंभर वेळा विचार करा. घरात वादविवाद होण्याची शक्यता आहे.   

3/9

कर्क (Cancer)

या राशींच्या लोकांना अनपेक्षित प्रसंगांचा सामना करावा लागणार आहे. व्यावसायिकांनी व्यवहार करताना सतर्क राहावे. तुमचे निर्णय या काळात चुकीचे ठरणार आहेत. महत्त्वाच्या कामातही अडथळे येणार आहेत. 

4/9

सिंह (Leo)

या राशींच्या लोकांना आरोग्याची काळजी करावी लागणार आहे. हॉस्पिटलच्या पायऱ्या चढण्याची वेळ यांच्यावर येणार आहेत. कामात सर्तक राहा, अन्यथा मोठं संकट तुमच्यावर कोसळू शकतं. आर्थिक व्यवहार करताना काळजी घ्या. 

5/9

कुंभ (Aquarius)

या राशीच्या लोकांना अनेक संकटांचा सामना करावा लागणार आहे. आरोग्याची समस्या उद्धभवणार आहे. उत्पन्नापेक्षा जास्त पैसे खर्च होणार आहेत. 

6/9

या राशींचे अच्छे दिन ! धनु (Sagittarius)

या काळ तुमच्यासाठी आनंदाचा असणार आहे. भौतिक सुखाच्या वस्तूंची खरेदी करणार आहात. संतती सुखात वाढ होणार आहे. आर्थिक फायदा या काळात होणार आहे.   

7/9

वृश्चिक (Scorpio)

या काळात तुमचा आत्मविश्वास वाढणार आहे. कार्यक्षेत्रात उत्साहसोबत यश प्राप्त होणार आहे. दुसरीकडे स्थलांतराची शक्यता आहे. मानसिक शांतता या दिवसांमध्ये लाभणार आहे. उत्पन्नात वाढ होणार आहे. 

8/9

वृषभ (Taurus)

उत्पन्नात वाढणार होणार असून अचानक धनलाभाचे योग आहेत. तुमचे बँक बलेन्स वाढणार आहे. घरात आनंदाचं वातावरण असणार आहे. प्रगतीचा मार्ग मोकळा होणार आहे.   

9/9

मेष (Aries)

हा काळ नातेसंबंध मजबूत करणारा ठरणार आहे. करिअरमध्ये प्रगती होणार आहे. आर्थिक फायदा होणार आहे. अविवाहित लोकांना लग्नाचे प्रस्ताव येणार आहे. ( Disclaimer - या ठिकाणी दिलेली माहिती ज्योतिष शास्त्रावर आधारित असून ती केवळ माहितीसाठी दिली जात आहे. झी 24 तास या गोष्टींना दुजोरा देत नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी संबंधित विषयातील तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्या. )