Shivrajyabhishek Din 2023 : जाणता राजा! आज 350 वा शिवराज्याभिषेक दिन; अभिमानानं द्या 'या' शुभेच्छा
आज तिथीप्रमाणे तर 6 जूनला तारखेप्रमाणे शिवराज्याभिषेक सोहळा संपन्न होणार आहे. रायगडावर गडदेवता म्हणजे शिर्काई देवीच्या पूजनाने कार्यक्रमाला सुरुवात झाली. ज्यानंतर राज्याभिषेकासाठी ज्या चांदीच्या पालखीचा वापर केला जाणार आहे त्या पालखीचंही पूजन करण्यात आलं. आजच्या दिवशी जगदीश्वराचंही मंत्रोच्चारात शास्त्रोक्त पध्दतीनं पूजन करण्यात आलं. ऐतिहासिक नंदीच्या दगडी मुर्तीवर तब्बल साडेतीनशे वर्षांनंतर पितळेचा मुखवटा बसवला गेला. (Shivrajyabhishek din sohala 2023 Raigad wishesh and greetings and photos )
Shivrajyabhishek Din 2023 : छत्रपती शिवाजी महाराज..... आई भवानीकडून अखंड महाराष्ट्राला मिळालेलं एक वरदान. राजाचं राजेपण कसं असावं तर ते महाराजांसारखं असावं, राज्य कसं करावं तर ते महाराजांसारखं करावं असं नेमकं का म्हटलं जातं हे महाराजांच्या व्यक्तीमत्त्वाकजे पाहूनच लक्षात येतं. अशा या रयतेच्या राजाचा आज 350 वा राज्याभिषेक सोहळा. या सोहळ्याची सध्या रायगडावर लगबग सुरु आहे.