Shiv Jayanti in New York : न्यूयॉर्क येथे शिवजयंती उत्साहात साजरी, छत्रपतींच्या कार्याचा गौरव!

Shiv Jayanti celebrated in New York : न्यूयॉर्क येथे शिवजयंती उत्साहात साजरी करण्यात आली आहे. छत्रपती फाउंडेशन आणि इंडियन कॉन्सिलेट यांच्या संयुक्त विद्यमाने हा कार्यक्रम आयोजित केला होता. यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी न्यूयॉर्क येथील कौन्सिलिट जनरल मिस्टर प्रधान  होते. 

Saurabh Talekar | Mar 06, 2024, 17:31 PM IST

Shiv Jayanti 2024 : शिवजयंती उत्साहात छत्रपतींच्या कार्याचा गौरव करत छत्रपतींच्या व प्रतिमेला पुष्पगुच्छ अर्पण केला आणि प्रतिमेस अभिवादन केले यावेळी बोलताना आपल्या अध्यक्षीय भाषणात त्यांनी उपस्थितांचं मन जिंकलं. 

1/5

विविध देशांमध्ये विविध वेळेमध्ये शिवजयंती साजरी होत असून छत्रपतींच्या कार्याचा गजर जगभरातील सोशल मीडिया बरोबरच कानाकोपऱ्यातील देशांमध्ये होत आहे एक अभिमानाची गोष्ट आहे, असं प्रधान यांनी म्हटलं आहे.

2/5

यावेळी शिवछत्रपती फाउंडेशनचे अध्यक्ष विनोद झेंडे यांनी शिवछत्रपती फाउंडेशन या संस्थेबद्दल आणि आजपर्यंत केलेल्या समाज उपयोगी विविध उपक्रमांची माहिती आपल्या प्रस्तावनेत दिली.

3/5

तसेच त्यांनी ही संस्था भारतातील विद्यार्थ्यांना कशाप्रकारे करिअर गायडन्स आणि व्यावसायिक मार्गदर्शन तसेच तरुणांना विजा आणि इतर गोष्टीविषयी जे मार्गदर्शन करते त्याविषयी थोडक्यात आढावा सांगितला यावेळी संस्थेचे मुख्य आधारस्तंभ आणि मार्गदर्शक स्वप्निल खेडेकर यांनी बिझनेस समेट कार्यक्रमही घडून आणला त्यावेळी या कार्यक्रमात अनेकांनी प्रश्न विचारले.

4/5

यावेळी वैशाली पाटील यांच्या ग्रुपने काही संस्कृतिक कार्यक्रमही केला तसेच यावेळी डॉक्टर संगीता तोडमल यांनी शिवछत्रपतींवर आधारित पोवाडा गायन केले तर अमेरिका इंगुळकर आणि मीरा काळे यांनी शिवबाचे मावळे आम्हाला नाही कुणाची भीती या गाण्यावर डान्स केला ज्यावेळी जिजाऊ च्या भूमिकेत तृप्ती काळे आणि शिवाजीच्या भूमिकेत सनील इंगुळकर यांनी विशेष सहभाग घेतला होता. यावेळी बोस्टन येथील दिलीप म्हस्के ,आणि इतर सहकारी यांचाही सत्कर करण्यात आला.

5/5

शिवछत्रपती फाउंडेशनला ज्या ज्या सामाजिक संस्थांनी मदत केली त्यांच्या प्रतिनिधींचाही या यावेळी आपार दळवी यांनी तांत्रिक प्रतिनिधी म्हणून उत्कृष्टरित्या कामगिरी केली. छत्रपती फाऊंडेशनचे उपाध्यक्ष महेंद्र सिनारे माधुरी सिनारे प्रशांत प्रसाद यांनी या कार्यक्रम यशस्वीतेसाठी विशेष सहकार्य केले यावेळी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मल्लिकाने केले.