नवरात्रीचे असे आहेत 9 रंग, प्रत्येक रंगाचा आरोग्यावर काय होतो परिणाम?

Navratri 9 Colors : नवरात्र हा सण रंगाचा सण आहे. नऊ दिवस वेगवेगळ्या रंगाची उधळण या सणामध्ये होत असते. या रंगाचा आपल्या भावनांवर आणि आरोग्यावर काय परिणाम होतो? 

| Oct 03, 2023, 15:46 PM IST

Navratri And 9 Colors : 15 ऑक्टोबर रोजी घटस्थापना असून या दिवशी देवी विराजमान होणार आहे. नऊ दिवसांचा हा सण अतिशय रंगानी भरलेला असतो. नऊ दिवसाचे नऊ रंग.. या रंगाचा आपल्या जीवनावर परिणाम होत असतो. हा परिणाम मानसिक आणि शारीरिक पद्धतीचा असतो. प्रत्येक रंग काही ना काही सांगत असतो. या रंगाचा आपल्या आरोग्याशी काय संबंध आहे हे जाणून घेणं अत्यंत गरजेचं आहे. रंग परिधान करताना त्या रंगाचा आपल्या शरीरावर काय परिणाम होतो हे समजून घेणे तितकेच गरजेचे आहे. 

1/7

रंगांचा कसा होतो परिणाम

Shardiya Navratri 2023 know 9 days 9 colours and their effect on Health

आपल्या आजूबाजूच्या परिसरातील रंगाचा विशिष्ट परिणाम शरीरावर होत असतो. हे रंग काही ना काही संदेश देत असतात. या रंगाचा मानसिक, भावनात्मक आणि सायकोलॉजिकल प्रभाव आपल्यावर पडत असतो. यामुळे रंगांना बघून आपल्या भावना बदलत असतात. या रंगांवर आपला मूड बिघडतो किंवा चांगला राहतो. 

2/7

नऊ दिवस नऊ रंग

Shardiya Navratri 2023 know 9 days 9 colours and their effect on Health

15 ऑक्टोबर - नारंगी  16 ऑक्टोबर - पांढरा  17 ऑक्टोबर - लाल 18 ऑक्टोबर - निळा  19 ऑक्टोबर - पिवळा  20 ऑक्टोबर - हिरवा  21 ऑक्टोबर - राखाडी 22 ऑक्टोबर - जांभळा  23 ऑक्टोबर - मोरपिशी रंग

3/7

लाल रंग

Shardiya Navratri 2023 know 9 days 9 colours and their effect on Health

लाल रंग जीवन, ऊर्जी आणि उत्साह याचे प्रतिक आहे. तसेच लाल रंग हा प्रेमाचा देखील रंग आहे. या रंगामुळे शरीरात उत्साह आणि एनर्जी संचारते. या रंगामुळे आपण ऍक्टिव राहतो तसेच एक वेगळाच उत्साह या रंगामुळे पाहायला मिळतो.   

4/7

भगवा रंग

Shardiya Navratri 2023 know 9 days 9 colours and their effect on Health

भगवा रंग हा ऊर्जेचे प्रतिक आहे. हा रंग पिवळ्या आणि लाल रंगाच्या तुलनेत अधिक प्रेरणादायी ठरते. हा एक अँटी डिप्रेसेंट रंग आहे जो आनंद देतो. निराशा आणि स्ट्रेस कमी करण्यासाठी मदत होते. 

5/7

हिरवा रंग

Shardiya Navratri 2023 know 9 days 9 colours and their effect on Health

हिरव्या गवतावर चालल्यामुळे आरोग्य उत्तम सुधारते. हेल्थ चांगले राहण्यासाठी हिरव्या पालेभाज्या कायमच फायदेशीर ठरतात. हिरवा रंग डोळ्यांना देखील सुखावणारा असतो. या हिरव्या रंगामुळे मन शांत राहतो. मन प्रसन्न राहण्यासाठी खूपच फायदेशीर ठरते. 

6/7

पांढरा रंग

Shardiya Navratri 2023 know 9 days 9 colours and their effect on Health

पांढरा रंग हा शांतीचे प्रतिक आहे. पांढऱ्या रंगाचे कपडे परिधान केल्यामुळे एंग्जायटी आणि स्ट्रेस कमी होण्यास मदत होते. पांढरा रंग तुम्हाला आतून शांत ठेवतो. शरीर थंड असल्यामुळे आरोग्य उत्तम राहते. 

7/7

पिवळा रंग

Shardiya Navratri 2023 know 9 days 9 colours and their effect on Health

स्ट्रेस आणि डिप्रेशन कमी करण्याचे काम पिवळा रंग करते. पिवळा रंग आपल्या आरोग्यावर खूप परिणाम करत असतो. पिवळा रंग हा आशेचा असतो. पिवळा रंग स्वास्थाचा रंग असतो.