Shani Vakri 2023 : आज शनिदेव वक्री! तब्बल 30 वर्षांनी कुंभ राशीत जुळून आला केंद्र त्रिकोण आणि शश महापुरुष राजयोग

Shani Vakri 2023 : तब्बल 30 वर्षांनी शनिदेवी कुंभ वक्री स्थितीत येणार आहे. या शनिदेवाच्या या स्थितीमुळे काही राशींच्या आयुष्यात भूकंप तर काही राशींच्या आयुष्यात चांदीच चांदी असणार आहे. 

Jun 17, 2023, 07:44 AM IST

Shani Vakri 2023 : आज शनिवारच्या दिवशी शनि अमावस्येलाच शनिदेव 30 वर्षांनी कुंभ राशीत वक्री स्थितीत जाणार आहे. शनि स्वतःच्या राशीत म्हणजे कुंभ राशीत मागे जाईल. 

1/7

शनि वक्री 2023

शनिदेवाच्या या प्रवासाला 140 दिवस लागणार आहे. शनि वक्रीमुळ काही राशींच्या आयुष्यात अडचणी तर काही राशींसाठी खूप भाग्यशाली ठरणार आहे.

2/7

शनिदेव स्वगृही

शनिदेव आज रात्री 10.48 मिनिटांनी शनी कुंभ राशीत प्रतिगामी होईल. तर 4 नोव्हेंबरला सकाळी 8.28 पर्यंत त्याच राशीत प्रतिगामी राहील. त्यानंतर खऱ्या अर्थाने शनि मार्गस्थ होणार आहे.

3/7

अधिक शक्तिशाली

वैदिक ज्योतिषशास्त्रानुसार शनि आपल्या प्रतिगामी अवस्थेत असताना अधिक शक्तिशाली होतो. अशा स्थितीत ज्या राशींवर शनिदेव प्रसन्न असतो त्यांचं नशिब एका रात्रीत पालटतं.   

4/7

वृषभ (Taurus)

या राशीच्या लोकांच्या कुंडलीत शनि वक्रीमुळे केंद्र त्रिकोण योग तयार होत आहे. त्यामुळे या लोकांचं भाग्य उजळणार आहे. तुमची आर्थिक स्थिती मजबूत होणार आहे. वैवाहिक जीवनात सुख समृद्धी नांदणार आहे. 

5/7

सिंह (Leo)

या राशीच्या लोकांच्या कुंडलीत शनी वक्रीमुळे शश महापुरुष राजयोग जुळून आला आहे. या राशीच्या लोकांच्या आयुष्यात पैसाच पैसा येणार आहे. तुमची आर्थिक स्थिती सर्वात चांगल्या स्तरावर जाणार आहे. 

6/7

मिथुन (Gemini)

शनि वक्री अवस्थेत असताना मिथुन राशीच्या लोकांवरील सर्व संकट नाहीसे होणार आहे. प्रत्येक कामात त्यांना यश मिळणार आहे. धनलाभाची शक्यता आहे. 

7/7

मकर (Capricorn)

शनिदेवाच्या वक्री अवस्थेमुळे मकर राशीच्या लोकांना कुंभ राशीचा लाभही मिळणार आहे. नोकरी-व्यवसायात पैसाच पैसा मिळणार आहे. अडकलेले पैसे परत मिळणार आहेत. (वरील माहिती सामान्य संदर्भांवरून घेण्यात आली आहे. 'झी २४ तास' याची खातरजमा करत नाही.)