जून-जुलैमध्ये पिकनिकचा प्लान करताय? 'ही' आहेत सर्वोत्तम ठिकाणे

उन्हाळ्याच्या सुट्टीतही एक वेगळीच मजा असते. लोकांना अनेकदा उन्हाळ्याच्या सुट्ट्या थंड ठिकाणी घालवायला आवडतात. भारतात अशी अनेक ठिकाणे आहेत जिथे उन्हाळ्यातही तापमान 6-10 अंशांच्या दरम्यानच असतं. 

Jun 16, 2023, 23:20 PM IST
1/5

केदारनाथ : केदारनाथला भेट देण्याचे प्रत्येकाचे स्वप्न आहे. १२ ज्योतिर्लिंगांपैकी एक असलेल्या केदारनाथचं वातावरण अतिशय सुंदर आहे. उष्णतेने सर्वांचेच हाल झाले असतानाच या ठिकाणची एक वेगळीच गंमत आहे. दर्शन घेऊन तुम्ही हवामानाचा आनंद घेऊ शकता. येथे भेट देण्यासाठी उन्हाळा हा सर्वोत्तम ऋतू मानला जातो.

2/5

स्पिती व्हॅली: उन्हाळ्याच्या सुट्ट्या घालवण्यासाठी स्पिती व्हॅली देखील सर्वोत्तम ठिकाणांपैकी एक आहे. एकदा इथे तुम्ही चंद्रताल, सूरज ताल, धनकर मठ, कुंझुम पास अशा अनेक ठिकाणांना भेट देऊ शकता. येथील तापमान काहीवेळा -2 अंशांपर्यंत घसरते.

3/5

सोनमर्ग : जर तुम्ही काश्मीर पाहिले नसेल तर या उन्हाळ्याच्या सुट्टीत जाण्याचा प्लॅन करा. जून महिन्यात तुम्ही मुलांसह संपूर्ण कुटुंबासह सोनमर्गला भेट देऊ शकता, या दरम्यान तापमान 7-12 अंश राहतं. येथील शिकारा बोट राईड सर्वांनाच रोमांचित करेल. 

4/5

कल्पा: हिमाचलचा कल्पा देखील उन्हाळ्याच्या सुट्ट्या साजरा करण्यासाठी सर्वात खास आहे. किन्नौरमध्ये वसलेले कल्पा गाव सतलज नदीच्या काठाच्या सौंदर्याचे प्रतीक आहे. इथली थंड हवा आणि खाण्याची मजा हे ठिकाण खास बनवते. 

5/5

सेला पास: केवळ हिमाचल-उत्तराखंडच नाही तर ईशान्य प्रदेश देखील उन्हाळ्याच्या प्रवासासाठी खूप चांगला आहे. अरुणाचल प्रदेशातील तवांगपासून 78 किमी अंतरावर सेला पास अतिशय सुंदर आहे. तवांग आणि सेला पास हे पर्यटनासाठी खूप चांगले पर्याय आहेत. सुंदर तलावाजवळ हायकिंग आणि पिकनिक करणे हा त्यांचा स्वतःचा आनंद आहे. जूनमध्ये येथील तापमान 8 अंशांपर्यंत राहते.