Shani Margi 2022: 23 ऑक्टोबरला शनिदेव मार्गी होणार; 2 दिवसानंतर या 5 राशिंचा भाग्योदय, मिटणार पैसाचा प्रश्न

Shani Mahadasha impact: शनिदेव 23 ऑक्टोबरपासून मार्गी होणार आहे. (Shani Margi) या वक्री चालीमुळे (Shani Gochar) काही राशांनी धोका आहे. 

Sep 21, 2022, 10:38 AM IST

Shani Mahadasha impact: शनिदेव नेहमी कर्मानुसार फळ देतो. आणि या कारणामुळे सर्व जण घाबरुन असतात. शनीची कृपा सर्वात महत्वाची मानली जाते. (Shani Mahadasha impact) ज्योतिषशास्त्रानुसार शनिदेव मकर राशीत गोचर होत आहे. त्यामुळे 23 ऑक्टोबरपासून शनिदेव मार्गी होणार आहे. (Shani Margi) या वक्री चालीमुळे (Shani Gochar) काही राशांनी धोका आहे. मात्र, या दरम्यान काही राशींना मोठी दिलासा मिळणार आहे. दोन दिवसांनंतर या पाच राशींनाच भाग्योदय असून त्यांना पैशाचा प्रश्न निकाली निघणार आहे. 

1/5

शनीचे संक्रमण(Shani Gochar)   मेष राशीच्या (Shani Mahadasha ) लोकांसाठी चांगला काळ घेऊन येत असून मान-सन्मान वाढेल. मेष राशीच्या दशमात शनीचे संक्रमण होत असून त्यातून लाभ होण्याची शक्यता आहे. व्यावसायिकांना याचा खूप फायदा होईल आणि व्यवसायात भागीदारीची योजना आखणाऱ्या लोकांसाठी ही चांगली वेळ आहे. याशिवाय नोकरीच्या शोधात असलेल्या लोकांना चांगली बातमी मिळू शकते. याशिवाय, कोणत्याही गुंतवणुकीतून अचानक आर्थिक लाभ होण्याची शक्यता आहे.

2/5

कर्क राशीच्या (Shani Gochar) सातव्या घरात शनिदेवाचे संक्रमण होणार असून यामुळे कर्क राशीच्या लोकांचे दुःख दूर होईल. यामुळे आदर वाढेल आणि तुम्हाला तुमच्या जीवनसाथीचा पाठिंबा मिळेल. कार्यक्षेत्रात बदल करण्याचा प्रयत्न करणाऱ्या लोकांसाठी हा काळ अनुकूल आहे.    

3/5

तूळ राशीच्या (Shani Gochar) चौथ्या घरात शनिदेवाचे संक्रमण होत आहे. त्यामुळे तूळ राशीच्या लोकांच्या उत्पन्नात वाढ होईल. या राशीच्या लोकांसाठी आर्थिक प्रगती होण्याची शक्यता असून काही चांगली बातमी ऐकायला मिळू शकते. विवाहित लोकांचे जोडीदारावरील प्रेम वाढेल आणि विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षांमध्ये यश मिळेल.

4/5

शनिदेवाचे (Shani Gochar)  संक्रमण वृश्चिक राशीच्या लोकांसाठी अनुकूल काळ घेऊन येत असून गुंतवणुकीसाठी हा काळ चांगला आहे. वैवाहिक जीवनात आनंद मिळेल आणि एखादी चांगली बातमी मिळण्याची शक्यता आहे. नोकरीच्या शोधात असलेल्या लोकांना चांगल्या ऑफर मिळू शकतात. याशिवाय वृश्चिक राशीचे लोक कोणतीही जमीन किंवा वाहन खरेदी करु शकतात.

5/5

शनिदेवाचे संक्रमण (Shani Gochar) मीन राशीच्या लोकांच्या जीवनात आनंद आणेल. तुम्हाला मानसिक तणावातून आराम मिळेल आणि तुम्हाला काम आणि व्यवसायात यश मिळेल. कामाच्या ठिकाणी सुरळीतपणे काम करु शकाल. याशिवाय प्रेमविवाहाला घरच्यांकडून मान्यता मिळू शकते.     (Disclaimer: येथे दिलेली माहिती सामान्य माहितीवर आधारित आहे. त्यामुळे  ZEE 24TAAS याची पुष्टी करत नाही.)