Pakistan Cricket : बाबरशी पंगा घेणाऱ्या शाहीन आफ्रिदीची संघातून हकालपट्टी? बॉलिंग कोचचा मोठा खुलासा, म्हणाले...

Pakistan Cricket Team : पाकिस्तानचा वेगवान गोलंदाज शाहीन शाह आफ्रिदीवर (Shaheen Shah Afridi) मुख्य प्रशिक्षक गॅरी कर्स्टन आणि टीम स्टाफसोबत गैरवर्तन केल्याचा आरोप आहे.

| Jul 12, 2024, 17:11 PM IST
1/5

बाबर आझम याच्या कामगिरीवर देखील पाकिस्तान क्रिकेट बोर्ड नाराज असल्याने पुन्हा शाहीन आफ्रिदीकडे संघाची जबाबदारी देण्यात येणार का? असा सवाल विचारला जात आहे. 

2/5

पीसीबीवर नाराज

शाहीनला टी-20 वर्ल्ड कपपूर्वी कर्णधारपदावरून हटवण्यात आलं होतं, ज्यामुळे तो पीसीबीवर नाराज होता. 2022 मध्ये झालेल्या टी-20 विश्वचषक स्पर्धेत पाकिस्तान ग्रुप स्टेजमधून बाहेर पडला होता.

3/5

पाकिस्तान टीममध्ये दोन गट

शाहीन आफ्रिदीने पाकिस्तान टीममध्ये दोन गट पाडले अन् कट रचले. खेळाडूंमध्ये एकी दिसली नाही, अशी माहिती पाकिस्तानी माध्यमामधून समोर आली आहे. 

4/5

जेसन गिलेस्पी

अशातच शाहीनच्या याच वर्तनामुळे त्याला बांगलादेश दौऱ्यातून बाहेरचा रस्ता दाखवण्यात आल्याची माहिती समोर आली होती. अशातच आता पाकिस्तानचे बॉलिंग कोच जेसन गिलेस्पीने महत्त्वाची माहिती दिली.

5/5

पत्नीसोबत वेळ

दरम्यान, शाहीन आफ्रिदी बाळाच्या जन्मामुळे बांगलादेशविरुद्धच्या कसोटीतून बाहेर असू शकतो. तोपर्यंत त्याला पत्नीसोबत वेळ घालवायचा असेल तर आपण त्याला ब्रेक देऊ शकतो, असं जेसन गिलेस्पीने सांगितलं.