काजोलच्या 'या' कृतीमुळे शाहरुखला बसला होता मोठा धक्का, घेतला होता हा मोठा निर्णय

बॉलिवूड अभिनेत्री काजोल आणि सुपरस्टार अभिनेता शाहरुख खान यांच्यामध्ये झालेली एक रंजक गोष्ट आम्ही तुम्हाला सांगणार  आहोत. जाणून घ्या सविस्तर

Soneshwar Patil | Sep 28, 2024, 14:14 PM IST
1/8

अनेक चित्रपट

अभिनेता शाहरुख खानला बॉलिवूडचा रोमान्स किंग म्हटलं जाते. शाहरुख खानने अनेक अभिनेत्रींसोबत काम केलं आहे. 

2/8

पहिली भेट

काजोल आणि शाहरुख खानने अनेक सुपरहिट चित्रपटांमध्ये काम केलं आहे. पण तुम्हाला माहिती आहे का की, शाहरुख खान काजोलला पहिल्यांदा भेटला तेव्हा त्याने काजोलसोबत काम न करण्याची शपथ घेतली होती.

3/8

शपथ

अभिनेता शाहरुख खानची काजोलसोबत पहिली भेट ही 'बाजीगर' चित्रपटाच्या सेटवर झाली होती. मात्र, सेटवर पहिल्याच दिवशी असे काही घडले की शाहरुख खानने काजोलसोबत काम न करण्याची शपथ घेतली. 

4/8

द कपिल शर्मा शो

अभिनेता शाहरुख खानने याचा स्वत: खुलासा केला आहे. जेव्हा तो काजोलसोबत 'द कपिल शर्मा शो'मध्ये पोहोचला होता. यावेळी दोघांनी खूप मस्ती केली आणि किस्से देखील सांगितले. 

5/8

बाजीगर

शाहरुख खान म्हणाला की, 'बाजीगर'च्या सेटवर तो काजोलला पहिल्यांदा भेटला होता. तिच्यासोबतच्या पहिल्याच भेटीत तो तिच्यावर चिडला होता. असे शाहरुख खानने सांगितले.   

6/8

पार्टी

तो दिवस 1 जानेवारी होता. पहिल्या रात्री पार्टी करून आम्ही सगळे जेव्हा सेटवर पोहोचलो आणि खूप थकलो होतो. अशा परिस्थितीत काजोल सेटवर येते आणि बडबड करायला लागते. 

7/8

शाहरुख खान अस्वस्थ

त्यानंतर शाहरुख म्हणाला, सेटवरील प्रत्येकाची अवस्था खूपच दयनीय होती आणि त्याचा काजोलला त्रास झाला नाही. ती फक्त बोलत राहिली. त्यावेळी मी खूप अस्वस्थ झालो आणि काजोलसोबत काम न करण्याची शपथ घेतली. पण हा एक विनोद होता. 

8/8

प्रेक्षक

ज्यावेळी शाहरुख खान हा किस्सा सांगत होता. त्यावेळी कपिल शर्माच्या सेटवर सर्वजण खूप जोरजोरात हसू लागले.