'ही' अभिनेत्री पेट्रोल पंपवर विकायची कॉफी, आईला कंटाळून दोनदा स्वतःला संपवण्याचा प्रयत्न

Entertainment News : ही चिमुकली आज बॉलिवूडवर राज्य करतेय. श्रीमंत घरात जन्माला आली असताना एकेकाळी पेट्रोल पंपवर ही अभिनेत्री कॉफी विकायची. ओळखलं का या बॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनत्रीला?  

Sep 18, 2023, 11:59 AM IST

Shabana Azmi Birthday : फोटोमध्ये दिसणारी ही वडिलांच्या मांडीवर बसलेली चिमुकली आज बॉलिवूडमध्ये राज्य करत आहे. घरातूनच कलेचा वारसा आणि प्रसिद्ध सेलिब्रिटीची पत्नी एकेकाळी पेट्रोल पंपवर कॉफी विकायची. एगदी आईला कंटाळून दोनचा तिने स्वतःला संपवण्याचा प्रयत्नही केला होता. 

1/16

अनेक संकटांवर मात करत बॉलिवूडमध्ये नसतं राज्य करत नाही तर राष्ट्रीय पुरस्कारवर तिने नाव कोरलं आहे. भारत सरकारकडून पद्मश्री आणि पद्मभूषण पुरस्काराने तिचा सन्मान झाला आहे.

2/16

ओळखलं का या अभिनेत्रीला? ही अभिनेत्री आहे 80 आणि 90 च्या दशकात आपल्या दमदार अभिनयाने प्रेक्षकांच्या मनावर राज्य करणारी शबाना आझमी.

3/16

प्रसिद्ध कवी कैफी आझमी यांच्या घरात जन्मलेल्या शबाना यांचा आज 73 वा वाढदिवस आहे. 1974 मधील अंकुर चित्रपटातून तिने अभिनय क्षेत्रात दमदार एन्ट्री मारली. 

4/16

सदाबहार अभिनेत्री सोबत ती एक सामाजिक कार्यकर्त्या देखील आहे. पण या स्थानावर पोहोचण्यासाठी तिला खूप संघर्ष करावा लागला. 

5/16

पहिल्या चित्रपटात मोलकरणीची भूमिका करुन तिने एकामागून एक चित्रपटामध्ये एकएकशे भूमिका केल्या. 

6/16

 महेश भट्टचा अर्थ मधून शबानाची एक वेगळीच छबी दिसली. त्यानंतर खंधार या चित्रपटाने धुमाकूळ घातला आणि त्याला कान्स फिल्म फेस्टिव्हलमध्ये दाखवण्यात आला. 

7/16

शबाना आझमी यांच्या आई शौकत आझमी यादेखील एक प्रसिद्ध अभिनेत्री होत्या. उमराव जान आणि सलाम बॉम्बेमध्ये दिसल्या. 2019 मध्ये शौकत यांनी जगाचा निरोप घेतला. 

8/16

अभिनेत्रीच्या आईने त्यांच्या ऑटोबायोग्राफी कैफ एंड आय मेमॉयरमध्ये शबाना यांच्याबद्दल अनेक मोठे खुलासे केले आहेत.

9/16

या पुस्तकानुसार शबाना यांची आई त्यांच्यावर कमी आणि भावावर जास्त प्रेम करायच्या. त्यावेळी त्यांनी ट्रेनसमोर येऊन आत्महत्येचा प्रयत्न केला होता. 

10/16

एकदा त्यांच्या जीवलग मित्राने आणि दुसऱ्यांदा शाळेच्या शिपायाने शबाना यांचा जीव वाचविला. 

11/16

तुम्हाला जाणून आश्चर्य वाटेल की, शबाना दिग्दर्शक शेखर कपूर यांच्यासोबत नातं होतं. दोघांचं नातं फार काळ टिकलं नव्हतं. 

12/16

शशी कपूर यांच्यावर शबाना आझमी यांचं क्रश होतं. पण नंतर त्यांच्या आयुष्यात जावेद अख्तर यांची एन्ट्री झाली. 

13/16

विवाहित जावेद अख्तर यांच्या प्रेमात पडल्यानंतर अनेक वेळा त्यांनी ब्रेकअपचा प्रयत्न केला होता.  जावेद यांनी पत्नीला घटस्फोट देऊन शबानासोबत लग्न केलं. 

14/16

श्रीमंत घरात जन्म झाला असतानाही त्या कॉफी विकायचा या कहाणीची कायम चर्चा होते. ते झालं असं की 'सीनियर केंब्रिजमध्ये फर्स्ट डिव्हिजन उत्तीर्ण झाल्यानंतर शबानाने कॉलेजमध्ये प्रवेश घेण्यापूर्वी तीन महिने पेट्रोल स्टेशनवर कॉफी विकली. यातून तो दिवसाला 30 रुपये कमावायच्या. घरात मदत करण्यासाठी तिने हे काम केलं होतं. 

15/16

लहानपणी त्यांच्या घरात अन्नदेखील नव्हतं. अशावेळी घरात फक्त तांदूळ होते. डाळ विकत घेण्यासाठी पैसे नव्हते. त्यावेळी शबाना आझमी यांनी आईच्या नावावर खोटं बोलून मैत्रिणीला पैसे मागतले होते. आईला माहिती पडल्यावर त्यांना खूप ओरडा पडला होता. 

16/16

नुकताच त्याचा प्रदर्शित झालेला ‘रॉकी और राणी की प्रेम कहाणी' या चित्रपटात धर्मेद्र आणि त्यांनी केलेल्या किस प्रकरणामुळे त्या चर्चेत आल्या होत्या.