Secret Of Tying Kalava : 'या' 5 झाडांना कलावा बांधणे शुभ, राहू-शनीचा प्रकोप दूर होऊन पैशांची होईल बरसात

Kalawa Tying Benefits :  तुम्ही पाहिलं असेल मंदिरात किंवा वडाच्या झाडाला कलावा बांधलेले असतात. ज्योतिषशास्त्रानुसार इच्छापूर्तीसाठी झाडाला कलावा बांधणे शुभ असतं. पण तुम्हाला माहिती आहे का, की कोणत्या कोणत्या झाडांना कलावा बांधला की लक्ष्मी नारायणाची तुमच्यावर कृपा राहते. 

Jan 25, 2023, 10:29 AM IST

Rules For Tying Kalawa in Trees :  आपल्या आजूबाजूला अनेकांच्या हाताला लाल पिवळ्या रंगाचा धागा बांधलेले लोक दिसतात. ज्योतिषशास्त्रात या धाग्याला कलावा असं म्हटलं जातं. हा कलावा बांधणं शुभ मानलं जातं. तुम्ही हेही पाहिलं असेल मंदिरातील अनेक झाडाला लोक इच्छापूर्तीसाठी कलावा बांधतात. हिंदू धर्मात कलावाला खूप महत्त्व आहे. त्यामुळे मंदिर परिसरात अनेक दुकानात कलावा विकण्यासाठी ठेवला जातो. ज्योतिषशास्त्रात काही झाडांना कलावा बांधल्यास तुमच्या आयुष्यातील संकट नाहीसे होतात. शिवाय तुमची आर्थिक भरभराट होते. आज आपण जाणून घेणार आहोत ती झाडं कुठली आहेत. (Kalawa Benefits kalawa bandhne ke fayde tie kalawa in these trees for money why do we wear kalawa in marathi)

 

1/5

तुळशीचं रोप

benefits of tie kalawa to tree

हिंदू धर्मात तुळशीच्या रोपाला विशेष महत्त्व आहे. तुळशीत लक्ष्मीचा वास असतो त्यामुळे ती अत्यंत पवित्र मानली जाते. शास्त्रानुसार तुळशीच्या रोपाला छोटा कलावा बांधल्याने तुमच्या सर्व इच्छा पूर्ण होता. 

2/5

केळीचं झाड

benefits of tie kalawa to tree

केळीचं झाडही हिंदू धर्मात शुभं मानलं जातं. शास्त्रानुसार गुरुवारच्या (Guruwar Upay) दिवशी केळीच्या झाडाला कलावा बांधल्यामुळे तुमच्यावर बृहस्पति ग्रहाचा आशीर्वाद मिळतो, असं शास्त्रात सांगितलं आहे.  त्यामुळे गुरुवारच्या दिवशी विवाहित महिला केळीच्या झाडाची पूजा करतात. 

3/5

शमीचं रोप

benefits of tie kalawa to tree

शनिदोषापासून (Shani Dosh Upay) मुक्ती मिळवण्यासाठी आणि महादेवाची कृपा प्राप्त करण्यासाठी शमीच्या रोपाला कलावा बांधणं शुभ मानलं जातं. असं म्हणतात की, शनिदेवाला प्रसन्न करण्यासाठी शमीच्या रोपाला कलावा बांधला पाहिजे. याशिवाय या उपायामुळे राहूचे दोषही (Rahu Dosh Upay) दूर होतात.

4/5

पिंपळाचं झाड

benefits of tie kalawa to tree

हिंदू धर्मात पिंपळाचं झाड पवित्र मानलं जातं. या झाडात ब्रह्मा, विष्णू आणि महेश यांचा वास असतो, असं शास्त्रात सांगण्यात आलं आहे. या झाड्याचा पानांमध्येही देवी देवतांचा वास असतो. मंगळवारी (Mangalwar ke Upay)आणि शुक्रवारी (Shukrawar Upay) पिंपळाच्या झाडाची पूजा केल्यानंतर कलावा बांधल्यास घरात सुख-समृद्धी नांदते. 

5/5

वडाचं झाड

benefits of tie kalawa to tree

वटवृक्षाची पूजा ही हिंदू धर्मात केली जाते. वट सावित्री व्रताच्या दिवशी महिला या झाडाची पूजा करतात. असं मानलं जातं की विवाहित महिलांनी वडाच्या झाडाला पूजन केल्यानंतर कलावा बांधला तर त्यांचा नवऱ्याला दीर्घायु प्राप्त होते आणि अकाली मृत्यूचा धोका टळतो.