40 कोटींची घड्याळं, 19 कोटींच्या हॅण्डबॅग, एकूण संपत्ती..; जगभर तिचीच चर्चा! मोदींबरोबरचा फोटो Viral

Rich Women Leader: या फोटोंमध्ये दिसत असलेल्या महिलेकडील संपत्ती आणि तिच्या कलेक्शनमध्ये असलेल्या वस्तू पाहून तुम्हाला धक्का बसल्याशिवाय राहणार नाही. ही महिला आहे तरी कोण आणि नेमकं काय करते जाणून घेऊयात...

| Jan 06, 2025, 09:27 AM IST
1/19

paetongtarnshinawatra

जगभरात सध्या या महिलेच्या संपत्तीची आणि तिच्याकडील आलिशान वस्तूंची चर्चा आहे. या महिलेचा पंतप्रधान मोदींबरोबरचा फोटोही चर्चेत आला आहे. नेमकी कोण आहे ही महिला आणि मोदींना कधी, कुठे भेटलेली जाणून घ्या...

2/19

paetongtarnshinawatra

वर फोटोत दिसणारी महिला सध्या जगभरामध्ये चर्चेचा विषय ठरतेय. आता तुम्हाला प्रश्न पडला असेल की ही महिला आहे तरी कोण?  

3/19

paetongtarnshinawatra

तर फोटोत दिसणारी ही महिला थायलंडच्या पंतप्रधान आहेत. पायतोंगटार्न शिनावात्रा (Paetongtarn Shinawatra) असं त्यांचं नाव आहे.  

4/19

paetongtarnshinawatra

सध्या 37 वर्षीय पायतोंगटार्न शिनावात्रा चर्चेत असण्यामागील कारण म्हणजे त्यांनी आपली संपत्ती किती आहे याची घोषणा केली आहे. राष्ट्रीय भ्रष्टाचार विरोधी कमिशनकडे पायतोंगटार्न शिनावात्रा यांनी आपल्या संपत्तीचं विवरण दाखल केलं आहे.

5/19

paetongtarnshinawatra

3 जानेवारी रोजी पायतोंगटार्न शिनावात्रा यांनी त्यांच्याकडील एकूण संपत्तीबरोबरच त्या कोणत्या आलीशान गोष्टींच्या मालकीण आहेत हे ही सांगितलं आहे.  

6/19

paetongtarnshinawatra

मात्र पायतोंगटार्न शिनावात्रा यांनी आपल्याकडे एकूण 13.8 बिलियन थाय भत म्हणजेच भारतीय चलनानुसार 3400 कोटी रुपयांची संपत्ती असल्याचं जाहीर केलं आहे.  

7/19

paetongtarnshinawatra

पायतोंगटार्न शिनावात्रा यांच्याकडील महागड्या गोष्टींमध्ये एकूण 75 दुर्मिळ, अतीदुर्मिळ आणि महागडी घड्याळं आहेत. या घडळ्यांची किंमत 40 कोटी रुपये इतकी आहे.  

8/19

paetongtarnshinawatra

पायतोंगटार्न शिनावात्रा यांच्या नावावर जपानबरोबरच लंडनमध्येही संपत्ती असल्याचं उघड झालं आहे. तसेच थायलंडमध्येही अनेक ठिकाणी पायतोंगटार्न शिनावात्रा यांची संपत्ती आहे.  

9/19

paetongtarnshinawatra

पायतोंगटार्न शिनावात्रा यांच्याकडे 167 डिझायनर आउटफिट्स आहेत. या डिझाइन्सची किंमत 60 लाख रुपयांहून अधिक आहे.  

10/19

paetongtarnshinawatra

पायतोंगटार्न शिनावात्रा या कारप्रेमी आहेत. त्यांच्याकडे एकूण 23 कार्स आहेत. त्यांच्या कारच्या ताफ्यामध्ये 'बेंटले फ्लाइंग स्पर हायब्रीड'बरोबरच 'रोल्स रॉइस फँटम' कारचाही समावेश आहे.  

11/19

paetongtarnshinawatra

फेउ थाई पक्षाच्या नेत्या असलेल्या पायतोंगटार्न शिनावात्रा यांनी 16 ऑगस्ट 2024 पासून पक्षाची धुरा हाती घेतली आहे. पायतोंगटार्न शिनावात्रा या थायलंडमधील राजकीय कुटुंबातील सदस्य असल्याने राजकारण त्यांच्या रक्तातच आहे. पायतोंगटार्न शिनावात्रा या थायलंडमधील सर्वात कमी वयात पंतप्रधान झालेल्या आणि केवळ दुसऱ्या महिला पंतप्रधान आहे.  

12/19

paetongtarnshinawatra

थायलंडच्या पंतप्रधान असलेल्या पायतोंगटार्न शिनावात्रा यांना महागड्या हॅण्डबॅग्सचीही आवड आहे. त्यांच्याकडे अनेक महागड्या हँडबॅग्जचा संग्रह आहे. पायतोंगटार्न शिनावात्रा यांनीच दिलेल्या माहितीनुसार, त्यांच्याकडे एकूण 217 लग्झरी हँडबॅग आहेत. त्यांची किंमत 19 कोटी रुपये इतकी आहे. 

13/19

paetongtarnshinawatra

पायतोंगटार्न शिनावात्रा यांनी गुंतवणूक आणि रोख रक्कम स्वरुपात आपल्याकडे एकूण 2530 कोटी रुपये असल्याचं जाहीर केलं आहे.  

14/19

paetongtarnshinawatra

तसेच पायतोंगटार्न शिनावात्रा यांच्या बँक खात्यावर 248 कोटी रुपये असल्याचं त्यांनी विवरणामध्ये नमूद केलं आहे.  

15/19

paetongtarnshinawatra

पायतोंगटार्न शिनावात्रा यांच्याकडील संपत्ती ही 2212 कोटी 44 लाख 25 हजार रुपये इतकी असल्याची माहिती आधी उपलब्ध होती.   

16/19

paetongtarnshinawatra

थायलंडचे माजी पंतप्रधान तसेच देशातील टेलिकॉम उद्योग व्यवसायातील सर्वात मोठं नाव असलेले थाकसिन शिनावात्रा हे पायतोंगटार्न शिनावात्रा यांचे वडील आहे.  

17/19

paetongtarnshinawatra

थाकसिन शिनावात्रा यांना तीन मुलं असून त्यापैकी पायतोंगटार्न शिनावात्रा या सर्वात धाकट्या आहेत.  

18/19

paetongtarnshinawatra

पायतोंगटार्न शिनावात्रा यांना एक मुलगा एक मुलगी अशी दोन मुलं आहेत.  

19/19

paetongtarnshinawatra

भारतात पायतोंगटार्न शिनावात्रा यांचा पंतप्रधान मोदींबरोबरचा फोटो चर्चेत आहे. गेल्या वर्षी ऑक्टोबरमध्ये, थायलंडच्या पंतप्रधान म्हणून पायतोंगटार्न शिनावात्रा यांनी व्हिएतनाममध्ये पूर्व आशिया परिषदेला हजेरी लावलेली. त्यावेळी त्यांनी भारताचे पंतप्रधान मोदींची भेट घेतली होती. तेव्हाचाच फोटो आता व्हायरल होतोय. (फोटो- Paetongtarn Shinawatra/Instagram वरुन साभार)