रत्नागिरीतील सवतसडा धबधब्याचं रौद्र रुप; पाण्याचा प्रवाह धडकी भरवणारा

सवतसडा धबधब्याचे धडकी भरवणारे फोटो. 

| Jul 15, 2024, 15:43 PM IST

Ratnagiri Sawatsada Waterfall : कोकणात पावसाने धुमाकूळ घातला आहे. रत्नागिरी जिल्ह्यातील अनेक नद्यांनी धोक्याची पातळी ओलांडली आहे.  रत्नागिरी जिल्ह्यात अनेक ठिकाणी पूरस्थिती निर्माण झाली आहे. अशातच रत्नागिरीतील सवतसडा धबधब्यानं रौद्र रुप धारण केले आहे.

1/7

 रत्नागिरी चिपळूणमध्ये मुसळधार पावसामुळे सवतसडा धबधब्यानं रौद्र रुप धारण केलंय. 

2/7

सवतसडा धबधबा  हा कोकणातील प्रसिद्ध धबधब्यांपैकी एक आहे.   

3/7

सह्याद्रीच्या कडेकपारीतून उंचावरून फेसाळणारा पांढराशुभ्र सवतसडा धबधबा तसा सुरक्षित आहे.

4/7

हिरव्यागार दाट गर्द झाडीतून सवतसडा धबधबा पर्यटकांना आकर्षित करतो.  

5/7

प्रशासनानं नागरिकांना धबधब्यावर न जाण्याचं आव्हान केले आहे.  

6/7

जोरदार पावसामुळे हा प्रचंड वेगाने वाहत आहे. 

7/7

मुंबई गोवा महामार्गावरील परशुराम घाटाच्या पायथ्याशी आहे हा धबधबा.