सारा तेंडुलकर सोशल मीडियावर लोकप्रिय, 'या' व्यक्तीची मोठी चाहती

पुन्हा एकदा साराची चर्चा 

| Mar 16, 2021, 11:57 AM IST

मुंबई : भारतातील क्रिकेटर सचिन तेंडुलकर जगभरात आपल्या खेळामुळे लोकप्रिय आहे. सचिनप्रमाणेच सचिनची मुलगी सारा तेंडुलकर देखील अतिशय लोकप्रिय आहे. सारा सोशल मीडियावर आपल्या स्ट्राँग पर्सनालिटीला अधोरेखित करते. आज आपण साराशी संबंधित काही खास गोष्टी जाणून घेणार आहेत. 

1/7

सारा तेंडुलकर सचिन आणि अंजलीची मोठी मुलगी आहे. साराचा लहान भाऊ अर्जुन तेंडुलकर वडिलांप्रमाणे क्रिकेटमध्ये करिअर करत आहे. अर्जुनने नुकतंच आपलं करिअर सुरू केलं असून त्याची लोकप्रियता मात्र सारापेक्षा कमी आहे. 

2/7

साराने मुंबईतील धीरूभाई अंबानी इंटरनॅशनल स्कूलमध्ये शिक्षण घेतलं आहे. यानंतरचं शिक्षण तिने लंडनमधील विद्यापिठात घेतलं आहे. सारा येथे मेडिसिनमध्ये डिग्री घेत आहे. 

3/7

साराच्या नावाबद्दल खूप मजेशीर गोष्ट आहे. सहारा कपमध्ये शानदार खेळ खेळल्यानंतर सचिन तेंडुलकरने मुलीचं नाव सारा असं ठेवलं. या सामन्यात सचिन कॅप्टन होता. मात्र यावर सचिनने कोणतीच प्रतिक्रिया दिलेली नाही. 

4/7

सोशल मीडियावर सारा मोठमोठ्या कलाकारांना टक्कर देत आहे. इंस्टाग्रावर साराचे 1.2 मिलियन फॉलोअर्स आहेत. यावरून साराच्या लोकप्रियतेचा अंदाज लावता येतो.   

5/7

सारा, लोकप्रिय गायक जस्टिन बीबरची खूप मोठी चाहती आहे. सात वर्षांपूर्वी 2013 मध्ये जस्टिनने साराला वाढदिवसाचं खास सरप्राईज दिलं होतं. साराने जस्टिनने दिलेल्या सरप्राईजचा व्हिडिओ शेअर केला होता. 

6/7

सारा, लोकप्रिय गायक जस्टिन बीबरची खूप मोठी चाहती आहे. सात वर्षांपूर्वी 2013 मध्ये जस्टिनने साराला वाढदिवसाचं खास सरप्राईज दिलं होतं. साराने जस्टिनने दिलेल्या सरप्राईजचा व्हिडिओ शेअर केला होता. 

7/7

व्हिडिओत जस्टिनने म्हटलं आहे की, 'हे सारा माझ्या मैत्रिणी कशी आहेस? मला कळलं तुझा आज वाढदिवस आहे. मी तुला सरप्राईज देणारा व्हि़डिओ तयार केला आहे. मी तु्झ्या भावनांचा आदर करते. माझी एवढी मोठी चाहती होण्यासाठी धन्यवाद'