'आम्ही दोघे एकमेकांवर..', तबेल्यातील इंटीमेट सीनबद्दल अभिनेत्री म्हणाली, 'संपूर्ण दिवस..'

Shruti Sharma Intimate Scene In Heeramandi With Rajat Kaul: सध्या 'नेटफ्लिक्स'वर प्रदर्शित झालेल्या 'हिरामंडी' या वेब सिरीजची जोरदार चर्चा सुरु आहे. याच सिरीजमधील काही इंटीमेट सीन्स सध्या सगळीकडे चर्चेचा विषय ठरत आहेत. अशाच एका सीनसंदर्भात चित्रपटात काम करणाऱ्या अभिनेत्रीने खुलासा केला आहे. ती काय म्हणाली आहे पाहूयात...

| May 11, 2024, 13:16 PM IST
1/12

Shruti Sharma Rajat Kau Intimate Scene

अभिनेत्री श्रृती शर्माने संजय लिला भन्साळींच्या 'हिरामंडी' वेबसिरीजमध्ये महत्त्वाची भूमिका साकारली आहे. ही भूमिका साकारताना अभिनेता रजक कौलबरोबर शूट करण्यात आलेल्या इंटिमेट सीनसंदर्भात श्रृतीने नुकतेच काही खुलासे केले आहेत. रजत यांनी मालिकेमधील मल्लिकाजानच्या कार चालक असलेल्या इक्बालची भूमिका साकारली आहे.

2/12

Shruti Sharma Rajat Kau Intimate Scene

श्रृतीने दिलेल्या माहितीनुसार, रजतबरोबरचा हा सीन शूट करण्यासाठी एक संपूर्ण दिवस लागला.  

3/12

Shruti Sharma Rajat Kau Intimate Scene

हा सीन शूट करुन झाल्यानंतर आपल्या अंगावर पुरळ उठल्याप्रमाणे ओरखडे दिसत होते, असंही श्रृतीने म्हटलं आहे.  

4/12

Shruti Sharma Rajat Kau Intimate Scene

श्रृतीने या मालिकेमध्ये शर्मिन सेहग यांच्या मोलकरणीची भूमिका साकारली आहे. मात्र अशाप्रकारचा सीन आपण पहिल्यांदाच शूट केल्याचं श्रृतीने सांगितलं.  

5/12

Shruti Sharma Rajat Kau Intimate Scene

'एंटरटेनमेंट लाइव्ह'ला दिलेल्या मुलाखतीमध्ये श्रृतीने, "असा एक सीन आहे ज्यामध्ये मी आणि इक्बाल फार रोमँण्टीक होतो. अशाप्रकारचा रोमॅन्स मी कॅमेरासमोर पहिल्यांदाच केला," असं सांगितलं. हा सीन शूट करताना अडचणी आल्याचंही श्रृतीने सांगितलं.

6/12

Shruti Sharma Rajat Kau Intimate Scene

"आम्ही हा सीन शूट करतना कथानकानुसार दोघे लोळता लोळता एकमेकांशी बोलत होतो. हा सीन चित्रत करणंही कठीण होतं. आम्ही अगदी एकमेकांवर पडलेलो," असं श्रृती म्हणाली.  

7/12

Shruti Sharma Rajat Kau Intimate Scene

"हा सीन शूट करता करता माझ्या अंगावर व्रण उठले कारण तो सीनच असा होता. मला वाटतं आम्ही संपूर्ण दिवस तो एकच सीन शूट केला. या सीनचं शुटींग पूर्ण झालं तेव्हा माझं काजळ पुसलं गेलं होतं कारण तिथे भारपूर धूळ होती. मात्र हा सीन फार छान चित्रित झाला," असं श्रृतीने सांगितलं.  

8/12

Shruti Sharma Rajat Kau Intimate Scene

या सीनमध्ये रजत आणि श्रृती लपून छपून भेटताना दाखवण्यात आलं आहे. रजत हा लाजत असतो तर दुसरीकडे श्रृती मात्र त्याला उद्युक्त करण्याचा प्रयत्न करत असते.  

9/12

Shruti Sharma Rajat Kau Intimate Scene

रजत आणि श्रृती हे दोघांवर चित्रत करण्यात आलेला हा सीन घोड्याच्या तबेल्यात दाखवण्यात आला आहे. तिथेच सुकलेल्या चाऱ्यावर त्यांच्या रोमॅन्स सुरु होतो, असं दाखवण्यात आलं आहे.  

10/12

Shruti Sharma Rajat Kau Intimate Scene

"संजय सर काही निवड करत असतील तर त्यांच्या डोक्यात असलेल्या भूमिकांप्रमाणेच ते कलाकार निवडतात. मला ठाऊक आहे की फार विचार करुनच तो सीन शूट करण्यात आला," असं श्रृती म्हणाली,  

11/12

Shruti Sharma Rajat Kau Intimate Scene

"तुम्ही त्यांच्या (भंन्साळींच्या) दृष्टीकोनावर प्रश्न विचारु शकत नाही. त्यांनी भारतीय सिनेसृष्टीत ऐतिहासिक काम केलं आहे. आपण शेवटी संजय लिला भन्साळींबद्दल बोलतोय हे लक्षात घेतलं पाहिजे," असं श्रृतीने या सीनबद्दल 'पिंकव्हिला'ला दिलेल्या मुलाखतीत म्हटलं होतं.

12/12

Shruti Sharma Rajat Kau Intimate Scene

'हिरामंडी'चे आठ भाग 1 मे रोजी नेटफ्लिक्सवर प्रदर्शित झाले आहेत. या चित्रपटामध्ये मनिषा कोईराला, अदिती राव हैदरी, सोनाक्षी सिन्हा, संजिदा शेख, शेखर सुमन, अध्ययन सुमन आणि रिचा चढ्ढा यांची प्रमुख भूमिका आहे.