मराठवाड्याची पोरं जेव्हा पहिल्यांदा समुद्र पाहतात; संदीप पाठक म्हणतो 'डोळ्यात पटकन पाणी पण...'

Sandeep Pathak On Marathwada water problem: मराठवाडा म्हणजे महाराष्ट्राचा दुष्काळी भाग. पाण्याच्या बाबतीत मराठवाड्यावर नेहमी अन्याय झाला, असं ऐकायला मिळतं.

Jul 28, 2023, 23:42 PM IST

Sandeep Pathak: मराठमोळा अभिनेता संदीप पाठक याने गेल्या काही प्रेक्षकांच्या मनावर अभिनयाची छाप सोडली आहे. मराठी चित्रपटसृष्टीतील नावाजलेल्या नावात संदीप पाठक याचं नाव घेतलं जातं. अशातच संदीप पाठक यांच्या मुलाखतीचा एक व्हिडिओ सध्या तुफान व्हायरल होत आहे.

1/5

मराठवा़ड्याच्या पाण्याचे किस्से

संदीप पाठक देखील मराठवाड्यातून येतो. तो बीडमधील माजलगाव या गावचा... अनेक मंचावरून संदीपने मराठवा़ड्याच्या पाण्याचे किस्से मांडले आहेत. अशातच आता त्याने एक किस्सा शेअर केलाय.

2/5

वक्तव्य चर्चेत

संदीप पाठक प्लॅनेट मराठीच्या 'पटलं तर घ्या' या कार्यक्रमात सहभागी झाला होता. त्यात त्याने केलेलं एक वक्तव्य चर्चेत आलं आहे.

3/5

21 व्या वर्षी पहिल्यांदा समुद्र पहिला तेव्हा...

संदीपने वयाच्या 21 व्या वर्षी पहिल्यांदा समुद्र पहिला. मी बीडचा असल्याने आमच्याकडे सतत दुष्काळ असतो. त्यामुळे समुद्राचं एवढं पाणी पाहून मी चकितच झालो, असं संदीप पाठक म्हणतो.  

4/5

डोळ्यात पटकन पाणी येतं पण...

आमच्या मराठवाड्यातील लोकांच्या डोळ्यात पटकन पाणी येतं पण नळाला लवकर येत नाही. आमच्याकडे घरात थेंबभर पाणी कुठं वाया जात असेल तर माझ्या आईचं ब्लडप्रेशर वाढतं, असंही संदीप पाठक म्हणतो.

5/5

पाणी वाया गेलं तर...

दरम्यान, हजारो लिटर पाणी वाया गेलं तर ते ऐकून सुद्धा आम्हाला दुःख होतं, असं म्हणत त्याने भावना व्यक्त केल्या आहेत.