PHOTO: संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखी सोहळ्यातील मानाच्या अश्वांचे अंकलीहून आळंदीकडे प्रस्थान

Saint Dnyaneshwar Maharaj Palkhi PHOTO: संत ज्ञानेश्वर माऊलींच्या पालखी सोहळ्यात अग्रभागी असणाऱ्या देवाच्या व स्वाराच्या अश्वांचे प्रस्थान आज झालं. हरिनामाच्या गजरात हा प्रस्थान सोहळा पार पडला. आळंदी मंदिरात परंपरांचे पालन करीत नागरिकांनी निर्जला एकादशी हरिनाम गजरात साजरी करण्यात आली. भाविकांनी श्रींचे दर्शन घेतले अन् हरिनामाचा गजर केला.  

| Jun 19, 2024, 15:10 PM IST
1/7

माऊलींचा पालखी सोहळा

माऊलींच्या पालखी सोहळ्यात ज्ञानेश्वर महाराज माऊलींच्या रथापुढे जो अश्व चालत असतो तो माऊलींचा अश्व. दुसरा अश्व ज्यावर जरिपटका घेऊन अश्वस्वार असतो तो स्वाराचा अश्व असे हे दोन अश्व असतात.

2/7

शितोळेराजे

या अश्वांची मानाची परंपरा कर्नाटकातील अंकली येथील शितोळेराजे यांच्याकडे आहे. सध्या ही परंपरा ऊर्जितसिंहराजे शितोळे सरकार हे चालवत आहेत. 

3/7

माऊलींचा अश्व आणि स्वाराचा अश्व

माऊलींचा अश्व आणि स्वाराचा अश्व हे दोन्ही अश्व सोहळ्यात सामील होण्यासाठी पायी अंकली येथून आळंदी येथे दाखल होतात. त्यानंतर हा प्रस्थान सोहळा पार पडतो.

4/7

निर्जला एकादशी

निर्जला एकादशी दिवशी या पालखी सोहळ्यात मानाचे स्थान असलेल्या माऊलींच्या अश्वाचे बेळगांवमधील अंकली येथून प्रस्थान झालं.

5/7

आळंदी

दोन्ही अश्व 28 जून रोजी संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळ्यात सहभागी होण्यासाठी आळंदीत दाखल होतील.

6/7

29 जून

तर 29 जून रोजी आळंदी मंदिरातून संत ज्ञानेश्वर महाराजचे वैभवी पालखी सोहळ्याचे आळंदी मंदिरातून प्रस्थान होणार आ

7/7

शितोळे सरकार

दरम्यान, शितोळे सरकारांच्या तंबूत माऊलींच्या पादुकांचा मुक्काम, नैवेद्य, समाज आरतीसाठी उपस्थिती, वारीतील न्याय निवाडा शितोळे सरकारांच्या ध्वजाखाली होणे असे रितीरिवाज कायम आहेत.