भारताचे चांद्रयान 3 पोहचण्याआधीच चंद्रावर Lunar Lander उतरवण्याचा रशियाचा प्लान; रॉकेट लाँचिंगसाठी रिकामं केले गाव

चांद्रयान- 3 आता 23 ऑगस्टला चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर सॉफ्ट लँडिंग करणार आहे. संपूर्ण जगाचे लक्ष भारताच्या चांद्रयान- 3 मोहिमकडे असतानाच आता रशियाने देखील चंद्र मोहिम हाती घेतली आहे. 

Aug 08, 2023, 00:06 AM IST

Chandrayaan 3 Vs Russia Lunar Mission: ISRO ने चांद्रयान 3 मोहिमेअंतर्गत चंद्राचा पहिला फोटो प्रसिद्ध केला आहे. भारताच्या या तिसऱ्या चंद्र मोहिमेला आलेलं हे पहिलं यश आहे. चांद्रयान 3 ने शनिवारी चंद्राच्या कक्षेत प्रवेश केल्यानंतर ही फोटो घेतली आहेत. 23 किंवा 24 ऑगस्ट रोजी भारताचे चांद्रयान 3  चंद्राच्या पृष्ठभागावर उतरणार आहे. भारताचे चांद्रयान 3 पोहचण्याआधीच चंद्रावर Lunar Lander उतरवण्याचा रशियाचा प्लान आहे. रॉकेट लाँचिंगसाठी रशियाती एक गाव रिकामं करण्यात आले आहे. 

 

1/5

50 वर्षांनंतर रशियाने पुन्हा एकदा चंद्रमोहिम हाती घेतली आहे. रशियन स्पेस एजन्सी Roscosmos च्या मते, रशिया 1976 नंतर पहिले चंद्र लँडर Luna-25 लाँच करणार आहे.  

2/5

 11 ऑगस्टला लुना-25 अवकाशात झेप घेईल. मात्र, हे यान चंद्राच्या पृष्ठभागावर कधी उतरेल हे जाहीर झालेले नाही. मात्र, 23 ऑगस्टपूर्वी म्हणजेच भारताचे चांद्रयान 3 पोहचण्याआधीच हे यान उतरवण्याचा रशियाचा प्लान आहे.   

3/5

 भारताचे चांद्रयान 3 हे दक्षिण ध्रुवावर उतरणार आहे. मात्र, चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर पोहोचणारा लुना-25 हा पहिला लँडर असेल असा दावा रशियाने केला आहे.   

4/5

रशिया सोयुझ-2 रॉकेटच्या मदतीने लुना-25 लँडर प्रक्षेपित करणार आहे.

5/5

रशियाची राजधानी मॉस्कोपासून पूर्वेला 5550 किमी अंतरावर असलेल्या व्होस्टोचनी कॉस्मोड्रोम येथून ये यान अंतराळात झेपावणार आहे.