माळशेज, खडकवासलाला जाताय? पुण्यानजीक कोणत्याही ठिकाणी जाण्याआधी वाचा ही बातमी, नाहीतर...

पुणे जिल्ह्यातील पर्यटन स्थळावर जमावबंदीचे आदेश जारी करण्यात आले आहेत. लोणावळ्यामध्ये पर्यटनासाठी गेलेलं कुटुंब वाहून गेल्याच्या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकाऱ्यांनी सुरक्षित पर्यटनाबाबतच्या उपायोजना राबवण्याच्या सूचना दिल्या आहेत.   

Jul 03, 2024, 15:02 PM IST

Pune News : राज्यात पावसानं जोर धरलेला असतानाच अनेकांचे पाय मुंबई, पुणे, अलिबाग आणि नाशिक अशा भागांमध्ये असणाऱ्या काही वर्षापर्यटनाच्या ठिकाणांकडे वळतात. पण, आता मात्र पुण्याच्या दिशेनं जाणार असाल तर दोनदा विचार करा. 

1/8

प्रशासन आदेशांनुसार...

Pune Administration tourist entry prohibitory order jawamvabndi in khadakwasla mulshi and other picnic spots

प्रशासन आदेशांनुसार पुणे जिल्ह्यातील मावळ, मुळशी, हवेली, आंबेगाव, खेड, जुन्नर, भोर आणि वेल्हा या आठ तालुक्यातील पर्यटन स्थळांवर निर्बंध घालण्यात आले आहेत. इथल्या पर्यटन स्थळावर पाच पक्षा जास्त व्यक्तींना एकत्र येण्यास प्रतिबंध असणार आहे.   

2/8

मावळ

Pune Administration tourist entry prohibitory order jawamvabndi in khadakwasla mulshi and other picnic spots

पर्यटन स्थळांवर होणारे अपघात टाळण्यासाठी वेगाने वाहणाऱ्या पाण्यात उतरणे, त्यात पोहणे यावर बंदी घालण्यात आली आहे. मावळ मधील भुशी धरण, गड किल्ले, लोणावळ्यातील विविध पॉईंट्स, आणि धबधबे इथं हे निर्बंध लागू असतील.   

3/8

मुळशी

Pune Administration tourist entry prohibitory order jawamvabndi in khadakwasla mulshi and other picnic spots

धबधबे, दऱ्यांचे कठडे, धोकादायक वळणे आदी ठिकाणी सेल्फी काढण्यास थांबणे या गोष्टींना देखील मान्य करण्यात आली आहे. ज्यामध्ये मुळशीतील मुळशी धरण, ताम्हिणी घाट जंगल परिसर, मिल्की बार धबधबा यांचा समावेश आहे.   

4/8

खडकवासला

Pune Administration tourist entry prohibitory order jawamvabndi in khadakwasla mulshi and other picnic spots

पुण्यातल्या हवेलीतील खडकवासला धरण, वरसगाव धरण, सिंहगड परिसर इथंही पावसाच्या धर्तीवर हे निर्बंध लागू करण्यात आले आहेत.   

5/8

भीमाशंकर

Pune Administration tourist entry prohibitory order jawamvabndi in khadakwasla mulshi and other picnic spots

ट्रेकर्सची पसंती असणाऱ्या आंबेगाव मधील भीमाशंकर, डिंभे धरण, कोंधवळ धबधबा इथं जमावबंदीचे आदेश लागू असतील. 

6/8

माळशेज घाट

Pune Administration tourist entry prohibitory order jawamvabndi in khadakwasla mulshi and other picnic spots

पुण्यानजीक जुन्नर मधील माळशेज घाट, धरणे आणि गड किल्ल्यांचा परिसर इथंही संभाव्य अपघातांचं सावट पाहता प्रशासनानं जमावबंदीचे आदेश लागू केले आहेत. 

7/8

वेल्हे

Pune Administration tourist entry prohibitory order jawamvabndi in khadakwasla mulshi and other picnic spots

पुण्याच्या वेल्ह्यातील गड किल्ले, धबधबे आणि धरण; भोर मधील भाटघर धरण, गड किल्ले आणि धबधबे इथं जाताना पर्यटकांनी जमावबंदीच्या निर्देशांवर नजर टाकावी.   

8/8

चासकमान धरण

Pune Administration tourist entry prohibitory order jawamvabndi in khadakwasla mulshi and other picnic spots

पुण्यातील निर्बंध लागू असणारी आणखी ठिकाणं म्हणजे, खेडमधील चासकमान धरण, भोरगिरी तसेच जंगल परिसर.