आधार अपडेट, क्रेडीट कार्ड ते बॅंक FD पर्यंत, 1 सप्टेंबरपासून बदलणार 9 नियम

सप्टेंबरपासून आधार फीस अपडेट, क्रेडीट कार्ड नियम, स्पेशल एफडीसहीत अनेक नियमांमध्ये बदल होणार आहेत.

| Aug 28, 2024, 14:19 PM IST

Rules Changes From 1st September: सप्टेंबरपासून आधार फीस अपडेट, क्रेडीट कार्ड नियम, स्पेशल एफडीसहीत अनेक नियमांमध्ये बदल होणार आहेत.

1/11

आधार अपडेट, क्रेडीट कार्ड ते बॅंक FD पर्यंत, 1 सप्टेंबरपासून बदलणार 9 नियम, सर्वसामान्यांच्या आयुष्याशी निगडीत!

Rules Changes From September Aadhar Affect on Commen Man Utility Marathi News

प्रत्येक महिन्याच्या पहिल्या तारखेला वेगवेगळ्या विभागात महत्वाचे बदल होत असतात. 1 सप्टेंबरपासून आधार फीस अपडेट, क्रेडीट कार्ड नियम, स्पेशल एफडीसहीत अनेक नियमांमध्ये बदल होणार आहेत. याचा परिणाम सर्वसामान्यांच्या आयुष्यावर पडणार आहे.

2/11

टेलिकॉम कंपन्यांसाठी महत्वाचे निर्देश

Rules Changes From September Aadhar Affect on Commen Man Utility Marathi News

RBI ने कार्ड टेलिकॉम कंपन्यांसाठी महत्वाचे निर्देश जारी केले आहेत. सिम जारी करणाऱ्यांना यूजर्सना इतर नेटवर्क वापरण्यापासून प्रतिबंधित करतात. यामुळे ग्राहकांच्या नेटवर्क निवडण्याच्या अधिकारावर गदा येते. यासंदर्भातील नियम 6 सप्टेंबरपासून लागू होईल.

3/11

मोफत आधार अपडेट

Rules Changes From September Aadhar Affect on Commen Man Utility Marathi News

युनिक आयडेंटिफिकेशन अथॉरिटी ऑफ इंडिया (UIDAI) ने मोफत आधार अपडेटची सुविधा 14 जून ते 14 सप्टेंबर 2024 पर्यंत 3 महिन्यांनी वाढवली आहे. तुम्हाला या काळात आधार अपडेट करुन घ्यावे लागणार आहे. 

4/11

क्रेडिट कार्ड पेमेंट

Rules Changes From September Aadhar Affect on Commen Man Utility Marathi News

IDFC FIRST बँकेच्या क्रेडिट कार्ड पेमेंटशी संबंधित नियमात बदल होणार आहे.यामध्ये किमान देय रक्कम (MAD) आणि पेमेंटची अंतिम तारीख देखील बदलली जात आहे.  हे दोन्ही बदल सप्टेंबर 2024 पासून लागू केले जातील.

5/11

क्रेडिट कार्डवर

Rules Changes From September Aadhar Affect on Commen Man Utility Marathi News

HDFC बँकेने क्रेडिट कार्डवरील लॉयल्टी प्रोग्रामचे नियम बदलले आहेत. नवीन नियम 1 सप्टेंबर 2024 पासून लागू होतील. बँकेने यासंदर्भात संबंधित कार्डधारक ग्राहकांना ई-मेलही पाठवला आहे.

6/11

उत्सव एफडी

Rules Changes From September Aadhar Affect on Commen Man Utility Marathi News

आयडीबीआय बँकेने उत्सव एफडीसाठी काही मुदत वाढवली आहे. आता तुम्ही 300, 375, 444 आणि 700 दिवसांसाठी उत्सव FD उघडू शकता. सामान्य लोकांना 300 दिवसांच्या उत्सव FD वर 7.05% व्याज मिळेल. या कालावधीसाठी ज्येष्ठ नागरिकांना 7.55% व्याज मिळेल. 375 दिवसांच्या उत्सव FD वर व्याज आधीच वाढले आहे. आता सर्वसामान्यांना 7.15 टक्के तर ज्येष्ठ नागरिकांना 7.65 टक्के व्याज मिळणार आहे.

7/11

इंड सुपर 300 डे

Rules Changes From September Aadhar Affect on Commen Man Utility Marathi News

इंडियन बँकेने 'इंड सुपर 300 डे' वर व्याज वाढवले ​​आहे. सर्वसामान्यांना पूर्वीपेक्षा जास्त व्याज मिळेल. याची मुदत वाढवण्यात आली असून तुम्ही 30 सप्टेंबरपर्यंत पैसे जमा करू शकता. या योजनेंतर्गत सर्वसामान्य नागरिकांना 7.05 टक्के, ज्येष्ठ नागरिकांना 7.55 टक्के आणि अति सुपर सिनियर सिटीझन्सना 7.80 टक्के व्याज मिळणार आहे.

8/11

विशेष एफडीवर जास्त व्याज

Rules Changes From September Aadhar Affect on Commen Man Utility Marathi News

पंजाब अँड सिंध बँकेने काही विशेष एफडीवर जास्त व्याज देऊ केले आहे. तुम्ही 222 दिवस पैसे जमा केल्यास तुम्हाला 6.30% व्याज मिळेल. 333 दिवस पैसे जमा केल्यावर तुम्हाला 7.15% व्याज मिळेल.ही ऑफर फक्त 30 सप्टेंबर 2024 पर्यंत आहे.

9/11

मृत कलश योजना

Rules Changes From September Aadhar Affect on Commen Man Utility Marathi News

SBI चे ग्राहक 30 सप्टेंबर 2024 पर्यंत अमृत कलश योजनेत गुंतवणूक करू शकतात. 400 दिवसांची विशेष कार्यकाल योजना अमृत कलश 12 एप्रिल 2023 पासून 7.10% व्याज देत आहे. यामध्ये ज्येष्ठ नागरिकांना 7.60 टक्के व्याज मिळते. ही योजना 30 सप्टेंबर 2024 पर्यंत वैध आहे.

10/11

SBI Wecare ची मुदत

Rules Changes From September Aadhar Affect on Commen Man Utility Marathi News

SBI Wecare ची मुदत 30 सप्टेंबर 2024 पर्यंत वाढवण्यात आली आहे. ही योजना नवीन ठेवी आणि परिपक्वता नूतनीकरणासाठी आहे. तुम्ही या योजनेचा लाभ नवीन ठेवीवर किंवा जुन्या ठेवी वाढवून घेऊ शकता. यामध्ये व्याजदरातही वाढ करण्यात आली आहे.

11/11

रिवॉर्ड पॉइंट्स

Rules Changes From September Aadhar Affect on Commen Man Utility Marathi News

NPCI ने सर्व बँकांना दिलेल्या निर्देशांनुसार RuPay क्रेडिट कार्डवर केलेल्या UPI व्यवहारांचे शुल्क हे रिवॉर्ड पॉइंट्स किंवा इतर लाभांमधून वजा करू शकत नाहीत. हा नियम 1 सप्टेंबर 2024 पासून लागू होणार आहे. याच्या मदतीने तुम्ही तुमचे रुपे क्रेडिट कार्ड अधिक वापरू शकता आणि अधिक फायदे मिळवू शकता.