Roti Benefits For Diabetes : 'या' पिठाच्या भाकरी मधुमेहाच्या रुग्णांसाठी संजीवनी, रक्तातील साखर घेतात शोषून

Roti Benefits For Diabetes : मधुमेह रुग्ण असलेल्या रुग्णांना अनेक अन्नपदार्थाचा त्याग करावा लागतो. रक्तातील साखरेची पातळी वाढली की त्यांचा जीवाला धोका असतो. अशाच या चार पिठाच्या भाकरी या रुग्णांसाठी संजीवनी ठरतात. 

Jan 24, 2023, 16:21 PM IST

Roti Benefits for Diabetes Patient : ज्यांच्या शरीरात इन्सुलिन हार्मोनचा स्त्राव कमी होतो त्यांना मधुमेहचा (Diabetes) त्रास होतो.  मधुमेह होण्यामागे अनेक कारणं असतात. त्यातच एक म्हणजे अनुवंशिक, लठ्ठपणा यामुळेही तुम्हाला मधुमेह होऊ शकतो. मधुमेहाच्या रुग्णांना शरीरातील साखरेचं प्रमाण (Sugar Control Tips) नियंत्रणात ठेवावं लागतं, अन्यथा त्यांचा जीवाला धोका होतो. या रुग्णांना यामुळे त्यांचा खाण्यापिण्यावर खूप नियंत्रण (Blood Sugar Level) ठेवावं लागतं. पण अनेक संशोधनांमधून हे सिद्ध झालं आहे की भरड धान्य मधुमेहाच्या रुग्णांसाठी संजीवनी ठरतं. कारण या पिठाच्या भाकरी खाल्ल्यामुळे तुमच्या शरीरातील साखर शोषून घेतात असं तज्ज्ञांचं मत आहे. (Roti Benefits for diabetes patient These flour breads raagi barley oats and jowar atta for diabetes Blood sugar under control marathi news)

 

1/5

जवाचं पीठ

Roti Benefits for diabetes patient

जवाचं पीठ म्हणजेच जव...हे पीठ मधुमेहाच्या रुग्णांसाठी खूप फायदेशी आहे. कारण यात फायबर, व्हिटॅमिन-सी आणि ए असं पोषक घटक आढळतात. यामुळे तुमच्या शरिरातील इन्सुलिनची पातळी सामान्य आणि नियंत्रणात राहते. याशिवाय हे पीठ खाल्ल्यामुळे तुमचं कोलेस्ट्ऱॉलची पातळीही नियंत्रित राहते.   

2/5

नाचणीचं पीठ

Ragis Roti Benefits for diabetes patient

नाचणीचं पीठ हे फायबरयुक्त असल्याने मधुमेहाच्या रुग्णांसाठी चांगलं मानलं जातं. नाचणीच्या पिठापासून बनवलेल्या भाकरी खाल्ल्याने तुमचं पोट दीर्घकाळ भरलेलं राहतं. यामुळे तुम्ही जास्त अन्न खात नाही आणि तुमचं वजन वाढत नाही. 

3/5

ओट्सचं पीठ

Oats Roti Benefits for diabetes patient

ओट्समध्ये जास्त प्रमाणात फायबर असतं, ज्यामुळे रक्तातील साखर नियंत्रणात राहते. याशिवाय, यामध्ये कमी कॅलरी असल्याने तुमचं वजन नियंत्रणात राहतं. 100 ग्रॅम ओट्समधून शरीराला 68 कॅलरीज आणि 21 ग्रॅम फायबर मिळतं.

4/5

ज्वारीचं पीठ

Jawar Roti Benefits for diabetes patient

मधुमेहाच्या रुग्णांसाठी ज्वारीचं पीठ हा एक चांगला पर्याय मानला जातो. त्यात फायबर, कार्बोहायड्रेट्स आणि अँटिऑक्सिडंट्सचं प्रमाणही जास्त असतं. त्यामुळे साखरेची पातळी नियंत्रणात राहते. 

5/5

राजगिरा पीठ

Roti Benefits for diabetes patient

या पिठात पोषक तत्व भरपूर असल्याने मधुमेहाच्या रूग्णासाठी फायदेशीर आहे. या पिठात प्रोटीन, खनिज, व्हिटामिन, आणि लिपिडसारखी पोषक तत्व आढळतात. यामुळे साखर नियंत्रणात राहते. (Disclaimer: येथे दिलेली माहिती सामान्य गृहीतके आणि माहितीवर आधारित आहे. ZEE 24 TAAS त्याची पुष्टी करत नाही.)