रोहित शर्मा की हार्दिक पांड्या? Mumbai Indians चा कॅप्टन कोण? MR. 360 म्हणतो...

Mumbai Indians : रोहित शर्मा हार्दिक पांड्याकडे जबाबदारी सोपवेल, अशी भविष्यवाणी एबीडीने केली आहे.

| Nov 25, 2023, 23:45 PM IST

AB De Villiers On Mumbai Indians Captaincy : मुंबई इंडियन्स संघव्यवस्थापनाने हार्दिक पांड्याबाबत (Hardik Pandya) अजूनही याबाबत अधिकृत माहिती दिली नाही. मात्र, यावर चर्चा सुरू आहेत. अशातच आता साऊथ अफ्रिकेचा आणि आरसीबीचा स्टार खेळाडू एबी डिव्हिलियर्स याने मोठं वक्तव्य केलंय.

1/7

हार्दिक पांड्या

पदार्पणाच्या हंगामातच गुजरात टायटन्स संघाला आयपीएल स्पर्धेचं जेतेपद मिळवून देणारा कर्णधार हार्दिक पांड्या मुंबई इंडियन्सकडे परतण्याची चिन्हं आहेत. 

2/7

पांड्या पुन्हा मुंबईकडे?

आयपीएलच्या २०२४ हंगामासाठी १९ डिसेंबरला दुबईत होणाऱ्या लिलावाआधी खेळाडूंची अदलाबदल होतीये. त्यात पांड्या पुन्हा मुंबईकडे येऊ शकतो.

3/7

एबी डिव्हिलियर्स

मुंबई इंडियन्स संघव्यवस्थापनाने अजूनही याबाबत अधिकृत माहिती दिली नाही. मात्र, यावर चर्चा सुरू आहेत. अशातच आता साऊथ अफ्रिकेचा आणि आरसीबीचा स्टार खेळाडू एबी डिव्हिलियर्स याने मोठं वक्तव्य केलंय.

4/7

मुंबई इंडियन्सचं कर्णधारपद

रोहित शर्मावर कसोटी आणि वनडे क्रिकेट टीमचा भार आहे. त्यामुळे मुंबई इंडियन्सचं कर्णधारपद तो हार्दिक पांड्याकडे सोपवू शकतो, असं वक्तव्य एबी डिव्हिलियर्सने केलं आहे.

5/7

पांड्याकडे जबाबदारी

हार्दिकमुळे त्याच्या कर्णधारपदाचा भार कमी होईल. मला फनी फिलिंग आहे की, रोहित शर्मा हार्दिक पांड्याकडे जबाबदारी सोपवेल, अशी भविष्यवाणी एबीडीने केली आहे.

6/7

महत्त्वाचा खेळाडू

हार्दिक पांड्या अनेक वर्षे मुंबई इंडियन्ससाठी खेळला. त्यामुळे हार्दिक पांड्या एक महत्त्वाचा खेळाडू आहे. त्याला वानखेडेवर खेळायला आवडतं. 

7/7

कॅप्टन व्हायची वेळ आली

गुजरातसाठी त्याने आयपीएल जिंकली आहे आणि पुढच्या पर्वात अंतिम फेरी गाठली होती. त्यामुळे असं वाटतंय की त्याची कॅप्टन व्हायची वेळ आली आहे, असंही मिस्टर 360 ने म्हटलं आहे.