आता तरी देवा मला पावशील का? वर्ल्ड कपआधी रोहित शर्मा तिरुपती बालाजी दर्शनला; पाहा Video

Rohit Sharma Visits Tirupati Balaji Temple: कॅप्टन रोहित शर्मा याने एशिया कप 2023 आधी तिरुपती बालाजीचं दर्शन घेतलं. त्याचे व्हिडीओ व्हायरल झाले आहेत.

Aug 13, 2023, 20:25 PM IST

Rohit Sharma at the Tirupati Balaji Temple: आशिया कपला येत्या 30 सप्टेंबरपासून सुरूवात होत आहे. तर येत्या 2 सप्टेंबरला भारत आणि पाकिस्तान यांच्यात सामना खेळवला जाईल. त्याआधी आता भारतीय खेळाडूंनी देवदर्शनला सुरूवात केली आहे. 

1/5

रोहित शर्मा तिरुपती बालाजी मंदिरात

आशिया स्पर्धेपूर्वी टीम इंडियाचा कर्णधार रोहित शर्मा आपल्या कुटुंबासह तिरुपती बालाजी मंदिरात पोहोचला. यावेळी रोहित पत्नी रितिका अन् सजदेह मुलगी देखील सोबत होती.  

2/5

चाहत्यांनी मंदिरात गर्दी

रोहित शर्मा तिरुपती बालाजी दर्शनाला आल्याचं समजताच चाहत्यांनी मंदिरात गर्दी केली. चाहत्यांनी त्याला गराडा घातला.

3/5

रोहित शर्मा

गेल्या 4 वर्षात दुसऱ्यांना रोहित शर्माने तिरुपती बालाजीचं दर्शन घेतलंय. गेल्या काही दिवसांपासून रोहित फॉर्ममध्ये नाही. त्यामुळे आता तरी देवा मला पावशील का? असं म्हणत रोहितवर नेटकऱ्यांनी टीका केली आहे.

4/5

वर्ल्ड कप 2019

मागील वर्ल्ड कपवेळी म्हणजेच 2019 मध्ये रोहित शर्मा तिरुपती मंदिरात गेला होता. 2019 च्या वर्ल्ड कप वेळीच्या त्याने धमाकेदार 4 शतक ठोकले होते.

5/5

विराट कोहली उज्जैन

नुकताच विराट कोहली पत्नी अनुष्का शर्मासोबत उज्जैनच्या महाकाल मंदिरात पोहोचला होता. त्यानंतर आता रोहित शर्माने तिरुपती बालाजी मंदिरात पोहोचून आशीर्वाद घेतलेत.