IPL 2023 मध्ये कर्णधार म्हणून धोणीच 'बॉस', तब्बल 'इतक्या' सामन्यात केलंय नेतृत्व
IPL 2023 Photos : आयपीएलचा हा सोळावा हंगाम आहे. गेल्या सोळा हंगामात सहभागी संघांनी अनेक कर्णधार पाहिले. पण याला अपवाद आहे महेंद्र सिंग धोणी (M S Dhoni). आयपीएलच्या (IPL 2023) पहिल्या हंगामापासून म्हणजे 2008 पासून एम एस धोणी चेन्नई सुपर किंग्सचं (Chennai Super Kings) नेतृत्व करतोय. आयपीएलमधला दुसरा सर्वात यशस्वी कर्णधार असलेल्या एम एस धोणीच्या नेतृत्वात चेन्नईने तब्बल चार वेळा आयपीएलचं जेतेपद पटकावलं आहे. सर्वाधिक सामन्यात कर्णधारपाची धुरा सांभाळण्याचा मानही धोणीला जातो. धोणीनंतर दुसऱ्या क्रमांकावर आहे मुंबई इंडियन्सचा (Mumbai Indians) कर्णधार रोहित शर्मा (Rohit Sharma).
1/6
Indian Premier League
2/6
Mahendrasingh Dhoni
3/6
Rohit Sharma
या यादीत दुसऱ्या स्थानावर आहे तो मुंबई इंडियन्सचा यशस्वी कर्णधार रोहित शर्मा (Rohit Sharma) रोहित शर्मा आयपीएलमध्ये 2013 पासून आतापर्यंत तब्बल 227 सामने खेळला आहे. यापैकी 143 सामन्यात रोहित शर्माने मुंबई इंडियन्सचं नेतृत्व केलं आहे. 143 सामन्यात 79 सामन्यात विजय मिळवता आला आहे तर 60 सामन्यात पराभव स्विकारावा लागला आहे. चार सामने टाय झालेत.
4/6
Virat Kohli
रॉयल चॅलेंजर्स बंगलोरचा कर्णधार विराट कोहली (Virat Kohli) या यादीत तिसऱ्या क्रमांकावर आहे. कोहली 2011 पासून आतापर्यंत आयपीएलमध्ये तब्बल 223 सामने खेळला आहे. यात त्याने 140 सामन्यांमध्ये संघाचं नेतृत्व केलं आहे. कोहलीच्या नेतृत्वात संघाला 64 सामन्यात विजय मिळवता आला आहे तर 69 सामन्यात पराभवाचा सामना करावा लागला आहे. तीन सामने टाय झाले आहेत. आरसीबीला अद्याप एकदाही आयपीएलच्या ट्ऱॉफीवर नाव कोरता आलेलं नाही.
5/6
Gautam Gambhir
माजी क्रिकेटर गौतम गंभीरने (Gautam Gambhir) कोलकाता नाईट रायडर्सला दोनदा जेतेपद मिळवून दिलं. या यादीत तो चौथ्या क्रमांकावर आहे. गंभीर आयपीएलमध्ये 2009 ते 2018 दरम्यान तब्बल 154 सामने खेळला. यापैकी 129 सामन्यांमध्ये त्याने कर्णधारपदाची जबाबदारी सांभाळली. गंभीरच्या नेतृत्वात 71 सामन्यात विजय तर 57 सामन्यात संघाला पराभव पत्करावा लागला. एक सामना टाय झाला.
6/6