Richa Chadha-Ali Fazal यांच्या रॉयल लग्नाचे फोटो...

Richa Chadha-Ali Fazal यांच्या लग्नाचा अल्बम तुम्ही पाहिलात का? सोशल मीडियावर त्याच्या लग्नाच्या फोटोंची चर्चा

Oct 04, 2022, 14:27 PM IST

बॉलिवूड स्टार कपल अली फजल (Ali Fazal) आणि रिचा चढ्ढा (Richa Chadha) अखेर सात जन्मासाठी लग्न बंधनात अडकले आहेत. सध्या त्यांच्या लग्नाचे फोटो सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहेत. दिल्लीत लग्न झाल्यानंतर रिचा आणि अली मुंबईत ग्रॅण्ड रिसेप्शन पार्टी देणार आहेत. या पार्टीत बॉलिवूडचे सर्व प्रसिद्ध सेलिब्रिटी उपस्थित राहू शकतात. रिचा आणि अली गेल्या 10 वर्षांपासून एकमेकांना डेट करत आहेत. दोघांची भेट 'फुकरे' सेटवर झाली होती.

1/6

लग्नाच्या फोटोंमध्ये दोघांचा रॉयल लूक चाहत्यांना घायाळ करत आहेत.   

2/6

 4 ऑक्टोबरला मुंबईत रिचा आणि अली यांचा रिसेप्शन सोहळा रंगणार आहे.   

3/6

फोटोमधून त्यांचं एकमेकांवर असलेलं प्रेम दिसून येत आहे.   

4/6

नवरीच्या रुपात रिचा सुंदर, तर अली रुबाबदार दिसत आहे.   

5/6

रिचा आणि अलीने त्यांच्या सोशल मीडियावर लग्नाचे खास फोटो शेअर केले आहेत. 

6/6