Rheumatoid arthritis : चुकूनही सांधेदुखीकडे दुर्लक्ष करू नका, असू शकतो 'हा' आजार

Rheumatoid Arthritis and Osteoarthritis In Marathi: तरुण वयातच सांध्याला सूज येणे, सांधा दुखत राहणे, हाताचे व छोटे सांघे आखडणे, दुखणे व नंतर दिवसभर हळुहलु सांध्यांना बरे वाटणे ही सांधेदुखीची लक्षणे असू शकतात. या रिम्युटाइट आर्थरायटिल अर्थात आनुवंशिक अथवा तारुण्यातील सांधेदुखीचा आजार आहे.  सध्या सांधेदुखीने अनेक लोक त्रस्त आहेत. अनेकदा पायऱ्या चढणे कठीण वाटत असेल किंवा सकाळी लवकर तुमचे सांधे दुखत असतील तर ते हलक्यात घेऊ नका. कारण हा संधिवात असू शकतो, असे अभ्यासक सांगण्यात आले आहे.

Apr 01, 2024, 17:10 PM IST
1/7

सांधेदुखीकडे दुर्लक्ष केल्याने दीर्घकालीन परिणाम होऊ शकतात. तसेच जीवनशैलीतील बदल, व्यायामाचा आणि योग्य आहाराचा अभाव आणि व्यस्त कामकाजाच्या पद्धतीमुळे संधिवात होण्याची शक्यता वाढते. 

2/7

विशेषत: स्त्रियांमध्ये संधिवातासारखे इतर प्रकार सामान्यत: आढळतात, असे संशोधनातून समोर आले आहे. ऑस्टिओअर्थराइटिस (OA) अनेकांसाठी चिंतेचा विषय आहे. 

3/7

परंतु गतिशीलता आणि जीवनाच्या गुणवत्तेवर त्याचा प्रभाव गंभीर दिसून येतो. सांधेदुखीकडे दुर्लक्ष केल्यास वेदना आणि सांध्यातील सूज यामुळे आरोग्यावर परिणाम होऊ शकतो.

4/7

ओए हा संधिवाताचा जगभरातील सर्वात प्रचलित प्रकार आहे. जो लाखो लोकांना प्रभावित करतो. प्रामुख्याने हात, गुडघे, नितंब आणि मणक्यासारख्या वजन सहन करणाऱ्या सांध्यांना लक्ष्य करतात. 

5/7

वेदना दीर्घकाळापर्यंत वाढतात आणि विश्रांती घेतल्याने आराम मिळतो. एकाच स्थितीत दीर्घकाळ बसल्यानंतर किंवा सकाळी उठल्यानंतर वेदना जाणवतात. 

6/7

सांध्यामध्ये आणि आजूबाजूला सूज येते. परिणामी गुडघ्यांमुळे चालण्याची क्षमता कमी होते. अनेकदा सांधेदुखीकडे लक्ष दिले जात नाही किंवा वृद्धत्वाचा नैसर्गिक परिणाम म्हणून दुर्लक्ष केले जाते.  

7/7

सांध्यामध्ये आणि आजूबाजूला सूज येते. परिणामी गुडघ्यांमुळे चालण्याची क्षमता कमी होते. अनेकदा सांधेदुखीकडे लक्ष दिले जात नाही किंवा वृद्धत्वाचा नैसर्गिक परिणाम म्हणून दुर्लक्ष केले जाते.