...तर मृत्यू अटळ! तरीही 'या' Black Sand Beach वर येतात हजारो पर्यटक; पाहा Photos
Black Sand Beach: या समुद्रकिनाऱ्याच्या एका बाजूला स्तंभासारखे वाटणारे डोंगर आहेत. हा समुद्रकिनारा अत्यंत धोकादायक असला तरी फार मोठ्या संख्येनं दरवर्षी हजारो पर्यटक या समुद्रकिनाऱ्याला भेट देतात. हा किनारा नेमका कुठे आहे, त्याचं वैशिष्ट्यं काय आहे जाणून घेऊयात...
Swapnil Ghangale
| Feb 10, 2024, 13:58 PM IST
1/8
2/8
3/8
4/8
'व्हिजीट आइसलॅण्ड डॉट कॉम'वरील माहितीनुसार, रेनिस्फराजा समुद्रकिनाऱ्यावर आदळणाऱ्या लाटा या फारच धोकादायक मानल्या जातात. या लाटांमुळे हा समुद्रकिनारा देशातील सर्वात धोकादायक किनारा आहे. या किनारपट्ट्यावर धडकणाऱ्या स्नीकर लाटा फारच शक्तीशाली असतात. या लाटा अचानक कुठेही निर्माण होतात आणि समुद्रकिनाऱ्यावर येऊन आदळतात. या लाटांचा असा नियोजित पॅटर्न ठरलेला नसल्याने त्या आपल्याबरोबर एखाद्याला घेऊन गेल्या तर त्याचा मृत्यू अटळ आहे असं समजलं जातं.
5/8
या धोकादायक स्निकर लाटांसंदर्भात इशारा देणारे अनेक बोर्ड या समुद्रकिनाऱ्यावर लावण्यात आले आहेत. रेनिस्फजारा किनारपट्टी फिरण्यासाठी येणाऱ्या पर्यटकांना सुरक्षेच्या नियमांकडे थोडंही दुर्लक्ष करु नका असा इशाराच दिला जातो. समुद्रकिनाऱ्यावरील फलकांवर लावण्यात आलेल्या सूचना वाचून त्या समजून घ्या. तसेच त्यांचे गांभीर्याने पालन करण्यास सांगितलं जातं.
6/8
7/8