Mukesh Ambani यांचा मास्टरस्ट्रोक, Jio च्या नव्या प्लॅनमध्ये वर्षभराचा रिचार्ज.. जाणून घ्या फायदे

बिझनेसमॅन आणि रिलायंस इंडस्ट्रीचे मालक मुकेश अंबानी यांची टेलीकॉम कंपनी असलेली रिलायन्स जियो देशातील लोकप्रिय टेलीकॉम कंपनी आहे. जियोनं 3 जुलै रोजी त्यांच्या पोर्टफोलियोला अपडेट करत टॅरिफ प्लान्स हे महाग केले होते. वाढ झाल्यानंतरही कंपनी त्यांच्या वापरकर्त्यांना वेगवेगळ्या प्राइस रेंजमध्ये अनेक रिचार्ज प्लान्स ऑफर केल्या होत्या. जे वेगवेगळ्या बेनिफिट्ससोबत येतात. 

| Aug 12, 2024, 18:43 PM IST
1/7

या प्लान्सची किंमत त्यांच्या व्हॅलिडिटी आणि डेटाच्या आधारवर वेगवेगळी असते. आज आम्ही तुम्हाला जियोच्या एका अशा प्लॅनविषयी सांगणार आहोत जो वर्षभरासाठी व्हॅलिड राहिल. 

2/7

रिलायन्स जियोचा चेअरमेन हा आकाश आहे. जियोनं भारतात इंटरनेट वापरकर्त्यांना सगळ्यात स्वस्त दरात आधी इंटरनेट देऊ त्याची क्रांती आणली होती. जियो लॉन्चनतर भारतात इंटरनेटच्या क्षेत्रात खूप बदल झाला. 

3/7

जियो कायम त्यांच्या वापरकर्त्यांना वेगवेगळ्या प्राइस रेंजचे प्लॅन्स ऑफर करत राहतात. वापरकर्त्यांसाठी रोज 1 GB, 1.5 GB, 2 GB डेटा असलेले प्लॅन्स उपलब्ध आहेत. वापरकर्ते त्यांच्या गरजेनुसार हे प्लॅन निवडू शकतात. 

4/7

रिलायंस जियोनं त्यांच्या ग्राहकांसाठी एक चांगला प्लॅन आता आणला आहे. हा एका वर्षाचा प्लॅन आहे की व्हॅलिडिटीचा प्लॅन आहे. या प्लॅनमध्ये वापरकर्ते 365 दिवस याचा अर्थ वर्षभर रिचार्ज करण्याची गरज भासणार नाही. त्यासोबत या प्लॅनमध्ये खूप डेटा, अनलिमिटेड, कॉलिंग आणि अनेक फायदे मिळतात. चला या प्लॅन्स विषयी सविस्तर जाणून घेऊया...

5/7

आम्ही जियोच्या ज्या प्लॅनविषयी बोलणार आहोत. त्याची किंमत ही 3599 रुपये आहे. हा प्लॅन 365 दिवस व्हॅलिडेट राहणार. या प्लॅनमध्ये नेटकऱ्यांना एकूण 912.5 GB डेटा प्लॅन मिळतो. याचा अर्थ रोज 2.5GB डेटा मिळतो. अनलिमिटेड कॉलिंगची सुविधा देखील मिळते. याचा अर्थ तुम्ही कोणत्याही नेटवर्कला हवा तितकावेळ कॉल करु शकता हवा तितका वेळ बोलू शकता. 

6/7

जियोच्या या प्लॅनमध्ये नेटकऱ्यांना रोज 100 SMS पाठवण्याची सुविधा देखील मिळते. त्यासोबत वापरकर्ते जियो टीवी, जियो सिनेमा आणि जियो क्लाउडचं सब्सक्रिप्शनमध्ये देखील मिळतो. त्याशिवाय तुम्ही 5G स्मार्टफोन वापरत असाल तर तुमच्या परिसरात 5G नेटवर्क हे उपलब्ध आहे आणि त्यासोबत तुम्ही हायस्पीड इंटरनेट वापरू शकतात. 

7/7

हा प्लॅन त्या लोकांसाठी आहे ज्यांना खूप जास्त डेटा वापरतात आणि अनलिमिटेड कॉलिंग हवं आहे. जर तुम्ही खूप इंटरनेट वापरत असाल तर 5G नेटवर्कचा वापर करू शकता. त्यांच्यासाठी हा प्लॅन योग्य आहे.