फक्त एका दगडावर उभे असलेले कोकणातील अनोखे मंदिर; आजूबाजूल घनदाट जंग आणि ओसंडून वाहणारा ओढा

जाणून घेऊया अनोख्या कोकणातील अनोख्या पर्यटनाविषयी. 

| Aug 12, 2024, 17:07 PM IST

Loteshwar Mandir Dugave Ratnagiri : निसर्गसौंदर्याने नटलेल्या कोकणात फक्त समुद्र किनारेच नाही तर येथे अनेक धार्मिक पर्यटन स्थळ देखील आहेत. यापैकी अनेक पर्यटन स्थळ फारशी पर्यटकांच्या परिचयाची नाहीत. अशाच सुंदर पर्यटनस्थळांपैकी एक आहे ते रत्नागिरीतील लोटेश्वर मंदिर. 

1/7

महाराष्ट्रात अनेक मंदिर ही स्थापत्यकलेमुळे प्रसिद्ध आहेत. मात्र, कोकणात एक छोटं मंदिर प्रसिद्ध आहे ते त्याच्या विशिष्ट रचनेमुळे.

2/7

लोटेश्वर हे स्वयंभू मंदिर आहे. या मंदिराबाबत अनेक अख्यायिका सांगितल्या जातात. मंदिराभोवतीचे सुंदर निसर्गसौंदर्य पर्यटकांना मंत्रमुग्ध करते.    

3/7

रत्नागिरीपासून सुमारे 25 किलोमीटर अंतरावर  कुरतडे या गावाजवळ असलेल्या डुगवे नावाच्या गावात हे मंदिर आहे. 

4/7

या मंदिराच्या पायथ्याशी पाण्याचा ओढा आहे. हा ओढा बारा महिने प्रवाहित असतो. 

5/7

साधारण 30 फूट उंच 25 फूट घेरा असलेल्या एका अखंड दगडावर हे मंदिर उभे आहे. 

6/7

 हे मंदिर जितके वैशिष्ट्यपूर्ण आहे तितकाच सुंदर परिसर या मंदिराभोवती आहे. या मंदिराच्या आजूबाजूला घनदाट जंगल आहे.   

7/7

रत्नागिरी जिल्ह्यातील लोटेश्वर मंदिर हे फक्त एका दगडावर उभे असलेले कोकणातील अनोखे मंदिर.