Reliance Jio: आधी किंमती वाढवल्या,आता मुकेश अंबानींनी आणले 4 पैसा वसूल प्लान; रोज 1.5GB डेटा आणि..

आता ग्राहकांना नव्या दरात रिचार्ज करावा लागतोय. पण Jio चे खूपच स्वस्त आणि अनेक फायदे असलेल्या 4 प्लानविषयी जाणून घेऊया.

Pravin Dabholkar | Aug 11, 2024, 14:32 PM IST

Jio Affordable Plans:आता ग्राहकांना नव्या दरात रिचार्ज करावा लागतोय. पण Jio चे खूपच स्वस्त आणि अनेक फायदे असलेल्या 4 प्लानविषयी जाणून घेऊया.

1/8

Reliance Jio: आधी किंमती वाढवल्या,आता मुकेश अंबानींनी आणले 4 पैसा वसूल प्लान; रोज 1.5GB डेटा आणि..

Reliance Jio 4 Cheapest Recharge Affordable Plans Free Calling Internet Tech Marathi News

Reliance Jio 4 Cheapest Recharge Plans: मुकेश अंबानीची रिलायन्स जिओ ही भारतातील सर्वात मोठी दूरसंचार कंपनी आहे. जिओने भारतीय स्मार्टफोन वापरण्याच्या पद्धतीत अमुलाग्र अशी क्रांती केली आहे. मुकेश अंबानी यांचा मुलगा आकाश अंबानी यांच्या नेतृत्वाखालील रिलायन्स जिओ अल्पावधीतच भारतातील सर्वात मोठी दूरसंचार कंपनी आहे.

2/8

किमती 3 जुलैपासून वाढल्या

Reliance Jio 4 Cheapest Recharge Affordable Plans Free Calling Internet Tech Marathi News

कंपनीने आपले जाळे देशभर पसरवले असून देशाच्या कानाकोपऱ्यात इंटरनेट उपलब्ध करून दिले आहे. रिलायन्स जिओने गेल्या महिन्यात केलेल्या घोषणनेनुसार जवळपास सर्व प्रीपेड योजनांच्या किमती 3 जुलैपासून वाढवल्या. 

3/8

स्वस्त आणि अनेक फायदे

Reliance Jio 4 Cheapest Recharge Affordable Plans Free Calling Internet Tech Marathi News

आता ग्राहकांना नव्या दरात रिचार्ज करावा लागतोय. पण Jio चे खूपच स्वस्त आणि अनेक फायदे असलेल्या 4 प्लानविषयी जाणून घेऊया.

4/8

जिओ 199 रुपयाचा प्लान

Reliance Jio 4 Cheapest Recharge Affordable Plans Free Calling Internet Tech Marathi News

या प्लानमध्ये तुम्हाला 18 दिवसांची वैधता मिळेल.सोबत दररोज 1.5 GB डेटा  म्हणजेच एकूण 27 GB डेटा मिळेल.अमर्यादित कॉलिंग, दररोज 100 एसएमएस आणि Jio TV, Jio Cinema आणि Jio Cloud चे सबस्क्रिप्शन देखील मिळेल.

5/8

जिओ 209 रुपयाचा प्लान

Reliance Jio 4 Cheapest Recharge Affordable Plans Free Calling Internet Tech Marathi News

या प्लानमध्ये तुम्हाला 22 दिवस जिओ वापरता येईल. रोज 1GB डेटा, म्हणजेच एकूण 22GB डेटा मिळेल. याच्या मदतीने तुम्ही तुम्हाला हवे तितके कॉल करू शकता आणि दररोज 100 एसएमएस पाठवू शकता. तुम्ही जिओच्या मनोरंजन सेवांचाही आनंद घेऊ शकता.

6/8

जिओ 249 रुपयांचा प्लान

Reliance Jio 4 Cheapest Recharge Affordable Plans Free Calling Internet Tech Marathi News

या प्लानमध्ये तुम्हाला पूर्ण 28 दिवसांची वॅलिडीटी मिळेल. यामध्ये तुम्हाला दररोज 1GB डेटा, म्हणजेच एकूण 28GB डेटा मिळेल. अनलिमटेड कॉल आणि रोज 100 एसएमएस पाठवू शकता. जिओच्या मनोरंजन सेवांचाही आनंद तुम्हाला घेता येणार आहे.

7/8

जिओ 299 रुपयांचा प्लान

Reliance Jio 4 Cheapest Recharge Affordable Plans Free Calling Internet Tech Marathi News

या प्लानमध्ये तुम्हाला पूर्ण 28 दिवसांची वॅलिडीटी मिळेल. रोज 1.5GB डेटा, म्हणजेच एकूण 42GB डेटा मिळेल. अमर्यादित कॉल आणि रोज 100 एसएमएस पाठवू शकता. जिओ एंटरटेन्मेंटचा फायदा तुम्हाला मिळू शकतो. 

8/8

जिओ डेटा प्लान

Reliance Jio 4 Cheapest Recharge Affordable Plans Free Calling Internet Tech Marathi News

रोजचा डेटा लवकर संपत असेल तर जिओकडे डेटा प्लानदेखील आहे. त्यांचा सर्वात स्वस्त डेटा प्लॅन 49 रुपयांचा आहे. ज्यामध्ये 1 दिवसासाठी अनलिमिटेड डेटा मिळतो.  359 रुपयांच्या प्लानमध्ये 30 दिवसांसाठी 50GB डेटा मिळतो.