बाजारात लॉन्च झाले रेडमीचे दोन नवे फोन...

Feb 14, 2018, 21:21 PM IST
1/8

CISF Constable Driver Recruitment 2018: Application process to start from February 19

CISF Constable Driver Recruitment 2018: Application process to start from February 19

चीनी मोबाईल कंपनी शाओमीने बुधवारी रेडमी नोट 5 आणि रेडमी नोट 5 प्रो लॉन्च केले. दोन्हीही फोन कंपनीने दोन दोन वेरिंएटमध्ये लॉन्च केले. त्याचबरोबर कंपनीने भारतात टी.व्ही. 4 सिरीजचे टेलिव्हिजनही लॉन्च केले.

2/8

CISF Constable Driver Recruitment 2018: Application process to start from February 19

CISF Constable Driver Recruitment 2018: Application process to start from February 19

रेडमी नोट 5 मध्ये 5.99 इंच आणि 1080x2160 पिक्सल रिजोल्युशनचा डिस्पले आहे. हा फोन अॅनरॉईड नूगाच्या बेस्ड एमआययूआय 9 वर चालतो. फोनमध्ये ऑक्टा-कोर स्नॅपड्रेगन 625  प्रोसेसर दिला आहे. फोनमध्ये 12 MP चा रिअर कॅमेरा आणि 5 MP चा फ्रंट कॅमेरा देण्यात आला आहे.

3/8

CISF Constable Driver Recruitment 2018: Application process to start from February 19

CISF Constable Driver Recruitment 2018: Application process to start from February 19

नोट 5 ला 32 GB आणि 64 GB स्टोरेज वेरिएंटसहित लॉन्च करण्यात आले आहे. मात्र दोन्हीही वेरिएंटमध्ये हायब्रिड सिम स्लॉट देण्यात आले आहे. 3 GB रॅमच्या वेरिंएटमध्ये 32 GB इंटरनल स्टोरेज आहे. फोनच्या 4 GB रॅम असलेल्या वेरिंएटमध्ये 64 GB इंटरनल स्टोरेज आहे.

4/8

CISF Constable Driver Recruitment 2018: Application process to start from February 19

CISF Constable Driver Recruitment 2018: Application process to start from February 19

रेडमी नोट 5 मध्ये 4000 mAh ची बॅटरी आहे. जी फास्ट चार्जिंगला सपोर्ट करते. यात प्रिमियम मेटल बॉडी दिली आहे. तर रेडमी नोट 4 अत्यंत पातळ आहे. या फोनच्या कॅमेऱ्यातून कमी प्रकाशातही चांगला फोटो येईल, असे कंपनीने सांगितले आहे.

5/8

Redmi Note 5 and Redmi Note 5 Pro launched in India

Redmi Note 5 and Redmi Note 5 Pro launched in India

रेडमी नोट 5 प्रो मध्ये 5.99 इंच आणि 1080x2160 पिक्सल रिजोल्युशनचा डिस्पले आहे. क्वॉलकॉम स्नॅपड्रेगन 636 प्रोसेसरचा जगातील हा पहिला स्मार्टफोन आहे. फोनमध्ये लेटेस्ट क्रायो 260 सीपीयू दिलेला आहे.  

6/8

Redmi Note 5 and Redmi Note 5 Pro launched in India

Redmi Note 5 and Redmi Note 5 Pro launched in India

नोट सिरीजमधला नोट 5 प्रो हा सर्वात फास्ट परफॉर्मन्स देणारा फोन असल्याचे कंपनीने सांगितले आहे. या फोनला 4 GB आणि 6 GB रॅमसोबत लॉन्च करण्यात आले आहे. दोन्हीही वेरिएंटमध्ये 64 GB चे इंटरनल स्टोरेज आहे. फोनमध्ये ड्युल फ्रंट कॅमेरा 20 MP चा आहे. 

7/8

Redmi Note 5 and Redmi Note 5 Pro launched in India

Redmi Note 5 and Redmi Note 5 Pro launched in India

कमी प्रकाशातही या फोनमध्ये सेल्फी चांगला येत असल्याचे कंपनीने सांगितले आहे. कॅमेऱ्यासोबत सेल्फी एलईडी लाईटही आहे. फोनमध्ये फेसअनलॉक फिचर देखील आहे. त्यामुळे चेहरा ओळखून फोन अनलॉक होईल. फोनमध्ये 4000 mAh ची दमदार बॅटरी आहे. हा फोन ब्लॅक, रोज, गोल्ड आणि ब्लू रंगात उपलब्ध आहे.

8/8

Redmi Note 5 and Redmi Note 5 Pro launched in India

Redmi Note 5 and Redmi Note 5 Pro launched in India

भारतीय बाजारात रेडमी नोट 5 ची किंमत 9,999 रुपयांपासून सुरू आहे. या किंमतीत 3 GB रॅम आणि 32 GB स्टोरेजचे वेरिएंट मिळेल. तर 11,999 रुपयात 4 GB रॅम आणि 64 GB स्टोरेजचे वेरिएंट  मिळेल. रेडमी नोट प्रो च्या 4 GB रॅमच्या वेरिएंटची किंमत १३,९९९ रुपये आहे. याच्या 6 GB रॅमच्य वेरिएंटची किंमत 16,999 रुपये आहे.