नोटबंदीची घोषणा; तुमच्या घरी दोन हजारच्या नोटा असतील तर आधी हे काम करा

सात वर्षांपूर्वी मोदी सरकारने नोटबंदी केली होती.  8 नोव्हेंबर 2016 ला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अचानक नोटबंदीची घोषणा केली होती. त्यानुसार चलनात असलेल्या 500 आणि 1 हजारच्या नोटांवर बंदी घालण्यात आली होती. यानंतर आता पुन्हा दोन हजारच्या नोटा बंद करण्यात आल्या आहेत. 

May 19, 2023, 20:42 PM IST

2000 Rupees Note: दोन हजार रुपयांच्या नोटांबाबत महत्त्वाची बातमी समोर आली आहे. 2 हजार रुपयांची नोट चलनातून बाद होणार आहेत. भारतीय रिझर्व्ह बँकेनं तसा निर्णय जाहीर केला आहे.  2 हजार रुपयांच्या नोटांची छपाई बंद होणार आहे. 2 हजार रुपयांच्या नोटांची छपाई बंद करण्याचे आदेश RBI  अर्थात रिझर्व्ह बॅंक ऑफ इंडियाने दिले आहेत.  

1/7

2 हजार रुपयांच्या नोटेबाबत भारतीय रिझर्व्ह बँकेनं मोठा निर्णय घेतला आहे. 

2/7

कधी चलनात आली होती दोन हजार रुपयाची नोट. 

3/7

बँकेामध्ये नोटा बदलण्यासाठी स्वतंत्र खिडकी सुरु केली जाणार आहे. 

4/7

एकावेळी जास्तीत जास्त 20 हजार रुपयांच्या नोटा बदली करता येतील.

5/7

23 मे ते 30 सप्टेंबर या कालावधीत बँकांमध्ये 2 हजार रुपयांच्या नोटा बदली करता येतील.

6/7

30 सप्टेंबरपर्यंतच या गुलाबी नोटा चलनात असणार आहेत.

7/7

2 हजार रुपयांच्या नोटांबाबत महत्त्वाची बातमी समोर आली आहे. 2 हजार रुपयांची नोट चलनातून बाद होणार आहे.