अमृता सिंगशी साखरपुडा, मॉडेलशी लग्न आणि 'या' अभिनेत्रीशी अफेअरच्या चर्चा; टीम इंडियाच्या खेळाडूची इतकी प्रेमप्रकरणं?

Ravi Shastri Love Affair : बॉलिवूड अभिनेत्री आणि भारतीय क्रिकेटपटू नातं हे खूप जुनं आहे. शर्मिला टागोर - टायगर पतौडी, युवराज - हेजल, हरभजन - गीता आणि अनुष्का - विराट. असा एक क्रिकेटपटू आहे ज्याची प्रेमकहाणी मीडियामध्ये गाजली. 

May 28, 2024, 12:50 PM IST
1/9

या टीम इंडियाच्या खेळाडूचा अमृता सिंगशी साखरपुडा ठरला होता. पण ते मोडलं त्यानंतरही त्याचे नाव अनेक अभिनेत्रींशी जोडलं गेलं. आम्ही बोलत आहोत रवी शास्त्री यांच्याबद्दल. रवि शास्त्री यांचा आज वाढदिवस आहे. त्यानिमित्ताने त्यांच्या लव्ह लाइफवर एक नजर टाकूयात. 

2/9

80 च्या दशकात बॉलिवूड आणि क्रिकेट सेलेब्समधील अफेअरच्या बातम्या सतत समोर येत होत्या. यातील एक अफेअर होतं अभिनेत्री अमृता सिंग आणि क्रिकेटर रवी शास्त्री यांचं. या दोघांच्या अफेअरने संपूर्ण बॉलिवूडला धक्का बसला होता. नोव्हेंबर 1986 मध्ये सिने ब्लिट्ज मासिकाच्या मुखपृष्ठासाठी अमृता आणि रवी यांचा एक फोटो झळकला होता. 

3/9

एका चित्रपट लेखकाने सांगितलं की हे दोघे न्यूयॉर्कमधील एका रेस्टॉरंटमध्ये एकत्र दिसले होते. याठिकाणी अमृताच्या बोटात अंगठीही घातली होती. त्याकाळात रवी देखणा क्रिकेटर तर अमृता बॉलिवूडमधील सुंदर अभिनेत्री होती.   

4/9

मीडिया रिपोर्टनुसार या दोघांमधील नात्याबद्दल ते गंभीर होते. मात्र त्यांचं प्रेम लग्नबंधनात बांधू शकल नाही. रवी यांनी एका मुलाखतीत सांगितलं होतं की, मी कोणत्याही अभिनेत्रीला आपली पत्नी बनवणार नाही. तर अमृताने म्हणाली होती की, मी सध्या करिअरवर लक्ष केंद्रित करत आहे. मला विश्वास आहे काही वर्षांनी मी पत्नी आणि आई या जबाबदाऱ्या पार पाडेल.   

5/9

यानंतर रवीने 1990 मध्ये रितू सिंह हिच्याशी लग्न केलं. रितू मुंबईतील क्लासिकल डान्स होती. मात्र 22 वर्षांनंतर या दोघांनी घटस्फोट घेतला. त्या दोघांना एक मुलगी आहे. 

6/9

2018 मध्ये, रवी पुन्हा एका चर्चेत आले. द लंचबॉक्स फेम निम्रत कौरच्या सौंदर्याने रवी घायाळ झाले अशी अफवा सोशल मीडियावर रंगली होती. 2015 मध्ये ऑडी टीटी कूपच्या लॉन्चिंगसाठीही दोघे भेटले होते. मीडिया रिपोर्टनुसार दोघेही 2 वर्षांपासून गुपचूप डेट करत आहेत, अशी चर्चा होती. 

7/9

ही अफवा निम्रत आणि रवी यांच्यापर्यंत पोहोचली. निम्रतने सोशल मीडियावर लिहिलं की, 'मला रूट कॅनलची गरज भासू शकतं. आज मी माझ्याबद्दल जे वाचले, अतिशय दु: खी आहे.'

8/9

तर रवी शास्त्री यांनी इंग्लंडहून 'मिड-डे' ला फोन करून म्हणाला की, 'हा शेणाचा जो काही भार आहे त्याबद्दल मला काहीही बोलायचं नाही. शेण भरलेलं असलेल्यांच्या डोक्यात हे असं काहीतरी येऊ शकतं.'

9/9

तुम्हाला जाणून आश्चर्य होईल अमृता सिंगनंतर रवी शास्त्री यांचं नाव डिंपल कपाडियासोबत जोडलं गेलं होतं. खरं तर, 80 च्या दशकात दोघेही एका पार्टीत एकत्र दिसले होते, त्यानंतर ही अफवा पसरली होती.