'मला आजही चीटर...' दीपिका, कतरिनासोबत ब्रेकअपविषयी पहिल्यांदाच बोलला रणबीर, तर 'वडील ऋषी कपूर हे रागीट...'

आलिया भट्टशी लग्न केल्यानंतर पहिल्यांदाच रणबीर कपूर दीपिका आणि कतरिनासोबतच्या ब्रेकअपबद्दल स्पष्ट बोलला आहे. त्याला देण्यात आलेल्या अय्याश 'या' टॅगवरही त्याने प्रतिक्रिया दिली आहे. एवढंच नाही तर वडिलांच्या निधनानंतर चार वर्षांनंतर त्यांचा स्वभावाबद्दल भाष्य केलंय. 

| Jul 22, 2024, 11:15 AM IST
1/9

रणबीर कपूर त्याच्या लव्ह लाइफमुळे कायम चर्चेत असतो. त्याने आलियाशी लग्न करण्यापूर्वी अनेक अभिनेत्रींना डेट केलंय. त्यावरुन तो अनेक वेळा ट्रोलही झाला आहे. त्याने कायम खुलेआम आपल्या प्रेमाची कबुलीही दिली आहे. 

2/9

रणबीर लग्नानंतर पहिल्यांदाच रणबीर दीपिका पादुकोण आणि कतरिना कैफ यांच्यासोबत असलेल्या रिलेशनशिपबद्दल बोलाय. या दोन टॉप अभिनेत्रीशी ब्रेकअप झाल्यानंतर त्याला चीटर आणि कॅसोनोव्हा असं हिणवण्यात आलं. 

3/9

रणबीर आज त्याचा प्रोफेशन आणि पसर्नल लाइफमध्ये सेट झाला आहे. करिअरमध्ये तो उत्तम काम करतोय तर संसारात आलिया आणि राहासोबत तो आनंदी आहे. पण त्याचा भूतकाळातील प्रेम प्रकरणावरुन कायम ट्रोल केलं जातं. 

4/9

अलीकडेच WTF People या पॉडकास्टमध्ये रणबीर कपूर आला होता. निर्मात्यांनी नुकताच या आगामी भागाचा ट्रेलर रिलीज केलाय. तिथे त्याने अनेक गोष्टींचा खुलासा केला. तो म्हणाला की, 'माझ्या भूतकाळात मी दोन यशस्वी अभिनेत्रींना डेट केलं होतं. पण त्यानंतर हीच माझी ओळख बनली होती. लोकांनी मला कॅसानोव्हा आणि चीटरचा टॅग दिला.' तो पुढे म्हणाला की, 'मी अनेक वर्ष या लेबलसह जगलो किंवा आजही जगत आहे.'

5/9

या मुलाखतीत त्याने अनेक मुद्द्यांवर चर्चा केली. तो म्हणाला की, 'तो स्वत:ला कधीही सहसा व्यक्त करत नाही आणि सहज रडतही नाही. मी थेरपी घेण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे मी थेरपीच्या विरोधात कधीच नाही. पण मला स्वत:ला इतरांसमोर व्यक्त होण्याची भीती वाटते.'

6/9

आलियासोबतही तो रिलेशनशिपमध्ये असताना त्याने हे नात कधीही लपवलं नाही. अनेक वर्ष डेट केल्यानंतर 2022 मध्ये दोघांनी लग्न केलं. या जोडप्याला आता 'राहा' नावाची गोंडस मुलगी असून तीही इतर स्टारकिड्सप्रमाणे सोशल मीडियात प्रचंड लोकप्रिय आहे.

7/9

या मुलाखतीत रणबीरने वडील ऋषी कपूरबद्दलही काही गोष्टी शेअर केल्या आहेत. तो म्हणाला की, 'माझं वडील खूप शॉर्ट-टेम्पर्ड स्वभावाचे पण खूप चांगले व्यक्ती होते. त्यांच्या डोळ्यांचा रंगही मी कधी पाहिला नाही. मी नेहमी त्याच्यासमोर मान खाली घालून उभा असायचो. त्यांना कधी नाही म्हटलंही नाही. ते जे काही बोलले ते मी शांतपणे स्वीकारले.'

8/9

मुलगी राहाविषयी रणबीरने सांगितलं की, जेव्हा तिचा जन्म झाला तेव्हा असं वाटलं की, 'मी माझ्या हृदयाचा एक तुकडा माझ्या मांडीवर ठेवलाय. मला वाटतं राहा आलियाला स्वतःचा एक भाग मानते पण जेव्हा तिला मजा करायची असते तेव्हा ती मला शोधते.'

9/9

बॉलिवूडमधील चॉकलेट बॉयच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचं झालं तर, सध्या रणबीर नितेश तिवारीच्या 'रामायण' चित्रपटात झळकणार आहे. या चित्रपटात तो रामच्या तर साऊथ अभिनेत्री सई पल्लवी सीतेच्या भूमिकेत दिसणार आहे.