बर्थडे गल रकुल प्रीतची एकूण संपत्ती जाणून बसेल धक्का ; Acting च नव्हे, ती करते 'हा' साइड बिझनेस.

रकुल प्रीत सिंग ही एक प्रसिद्ध बॉलिवूड अभिनेत्री आहे. कन्नड चित्रपटातून त्यांनी अभिनयाच्या दुनियेत प्रवेश केला. तुम्हाला माहिती आहे का की, तिचे लहानपणापासूनच अभिनेत्री बनण्याचे स्वप्न होते आणि तिचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी तिने कॉलेजमध्येच मॉडेलिंग सुरू केली होती . 

Oct 10, 2023, 13:02 PM IST

रकुल प्रीत सिंग ही एक प्रसिद्ध बॉलिवूड अभिनेत्री आहे. कन्नड चित्रपटातून त्यांनी अभिनयाच्या दुनियेत प्रवेश केला. तुम्हाला माहिती आहे का की, तिचे लहानपणापासूनच अभिनेत्री बनण्याचे स्वप्न होते आणि तिचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी तिने कॉलेजमध्येच मॉडेलिंग सुरू केले.  बॉलिवूड आणि साऊथची प्रसिद्ध अभिनेत्री रकुल प्रीत सिंगबद्दल. ऑडिशनसाठी लांबलचक रांगेत उभं राहून आणि अनेक नकारांना तोंड देत ती इथपर्यंत पोहोचली आहे. तिचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी तिने वयाच्या १८ व्या वर्षी मॉडेलिंगला सुरुवात केली. त्यानंतर 2009 मध्ये अशी वेळ आली जेव्हा रकुलला तिचा पहिला सिनेमा आला... आज रकुलच्या ३३व्या वाढदिवसानिमित्त जाणून घेऊया तिच्याबद्दलच्या काही रंजक गोष्टी.

1/7

राकुलचे जन्म आणि शिक्षण ..

रकुल प्रीत सिंग ही मूळ दिल्लीची आहे, रकुलचा जन्म 10 ऑक्टोबर 1990 रोजी दिल्लीत एका पंजाबी कुटुंबात झाला. आर्मी पब्लिक स्कूल, धौला कुआन येथून तिचं शालेय शिक्षण झालं. त्यानंतर जीझस अँड मैरी कॉलेजमधून गणित विषयात पदवी पूर्ण केली.    

2/7

राकुलने तिचा पहिला चित्रपट जास्त पैश्यांसाठी निवडला होता ..

रकुलने कन्नड चित्रपट गिलीमधून अभिनयाची सुरुवात केली. पण  रकुलला साऊथ इंडस्ट्री किती मोठी आहे याची कल्पना नव्हती.  तिचे मत असे होते की  'मी थोडा जास्त पॉकेटमनी मिळवण्यासाठी हा चित्रपट साईन केला आणि साऊथचे चित्रपट किती मोठे आहेत याची मला कल्पना नव्हती.' 

3/7

रकुलचा पहिला हिंदी चित्रपट ...

राकुलने कन्नड सिनेमांमधून अभिनयाला सुरुवात केली होती पण 2014 मध्ये प्रदर्शित झालेला 'यारियां' हा त्याचा पहिला हिंदी चित्रपट ठरला होता. 

4/7

रकुलचा साईड बिझनेस :

राकुलच्या व्यवसायाबद्दल बोलायचे झाले तर, रकुल प्रीत सिंग जिमची मालक आहे. त्यांची F45 Training नावाची जिम आहे. या फ्रँचायझीमध्ये सध्या तीन जिम आहेत. हैदराबादमध्ये दोन आणि विशाखापट्टणममध्ये एक. 2021 मध्ये रकुलने तिचा भाऊ अमनसोबत 'स्टारिंग यू' नावाचे अॅपही लॉन्च केले. हे इच्छुकांना भौतिक अंतर आणि सीमांवर मात करण्यास मदत करते.  

5/7

रकुल प्रीतने दक्षिण चित्रपट श्रुष्टीत तसेच बॉलिवूडमध्ये एक उत्कृष्ट अभिनेत्री म्हणून स्वत:चे नाव कमावले आहे.

रकुल तिच्या तामिळ, तेलुगू आणि हिंदी चित्रपटांमध्ये काम करण्यासाठी ओळखली जाते. तर  राकुलचे  घर, आलिशान कार आणि करोडो रुपयांची संपत्ती आहे. रिपोर्ट्सनुसार, 2022 पर्यंत रकुलची अंदाजे एकूण संपत्ती $6 दशलक्ष आहे, सुमारे 45 कोटी रुपये. तिला एका चित्रपटासाठी 2 कोटी रुपये मिळतात आणि अनेक ब्रँड प्रमोशन आणि जाहिरात मोहिमेद्वारे ती 50 लाख रुपये कमावतात, असे उद्योग सूत्रांनी सांगितले आहे.

6/7

राकुल प्रीतचे गाजलेले चित्रपट..

राकुल प्रीत लॉकयाम  (2014), करंट  थेगा  (2014), नन्नाकू प्रेमाथो  , सरैनोडू  आणि ध्रुव (2016) यांसारख्या गाजलेल्या चित्रपटांमध्ये दिसली आहे .  यापैकी नन्नाकू प्रेमाथो मधील तिच्या अभिनयामुळे रकुल प्रीतला सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा (तेलुगु) पहिला SIIMA पुरस्कार मिळाला. तिच्या 2022 च्या रिलीजमध्ये अटॅक: पार्ट वन, रनवे 34, कटपुटल्ली, डॉक्टर जी आणि थँक गॉड यांचा समावेश आहे. तिच्या 2023 च्या रिलीजमध्ये छत्रीवाली, मेरी पटनी का रिमेक आणि इंडियन 2 यांचा समावेश आहे. 

7/7

जॅकी भगनानीला डेट करत आहे.

वैयक्तिक आयुष्याबद्दल बोलायचे झाले तर रकुल अभिनेता आणि निर्माता जॅकी भगनानीसोबत रिलेशनशिपमध्ये आहे. त्यांचे हैदराबादमध्ये घर आहे आणि मुंबईतही स्वतःचा अपार्टमेंट आहे.