प्रवासासाठी किती पेट्रोल लागणार, टोलचा एकूण खर्च किती येणार? भारत सरकारचं एक App करणार तुमची मदत

Travel App News : तुम्हीही प्रवासाला निघण्याच्या विचारात आहात का? तर हे एक अॅप तुमची बरीच मदत करणार आहे...   

Mar 25, 2024, 10:25 AM IST

Travel App News : प्रवासाला निघत असताना अनेकदा पूर्वतयारी गरजेची असते. त्यातही प्रवास लांबच्या पल्ल्याचा असला की खर्चापासून खाण्यापर्यंत सर्वच सुविधा आणि अगदी Backup अर्थात पर्यायी व्यवस्थासुद्धा हाताशी ठेवावी लागते. 

 

1/8

महामार्गांवरून प्रवास करताना...

rajmarg yatra app national highways authority of india launches app for national highway travel

महामार्गांवरून प्रवास करत असताना अनेकदा प्रवासादरम्यान काही गोष्टींची आवश्यकता भासते. त्यातील सर्वात मह्त्वाची गरज असते ती म्हणजे इंधन अर्थात पेट्रोल- डिझेल आणि सीएनजीची.   

2/8

पेट्रोलपासून टोलपर्यंतची माहिती

rajmarg yatra app national highways authority of india launches app for national highway travel

अनोळखी वाटांवर निघालं असता अनेकदा ही महत्त्वाची माहिती आपल्या हाताशी नसते. बऱ्याचदा नेटवर्क नसल्यामुळं दुर्गम भागांमध्येही अनेकदा ही अडचणीची परिस्थिती निर्माण होते. अशा प्रसंगी तुम्हाला किती रुपयांचा टोल भरावा लागणार यासंबंधीचीही माहिती मिळणार आहे. 

3/8

एका क्लिकवर सर्व माहिती

rajmarg yatra app national highways authority of india launches app for national highway travel

Nearest repair shop, तुमच्या नजीकचा पेट्रोल पंप, नजीकचं रेस्तराँ, यासंबंधीची माहिती तुम्हाला राजमार्ग यात्रा अॅपवरून मिळणार आहे. 

4/8

लॉगईन

rajmarg yatra app national highways authority of india launches app for national highway travel

यासाठी तुम्ही फक्त अॅपस्टोअर किंवा प्ले स्टोअरवरून हे अॅप डाऊनलोड करणं अपेक्षित आहे. त्याशिवाय दूरध्वनी क्रमांकाच्या मदतीनं तुम्ही यावर लॉगईन करू शकता. 

5/8

अॅप सुरु केल्यानंतर....

rajmarg yatra app national highways authority of india launches app for national highway travel

अॅप सुरु केल्यानंतर तिथं तुम्हाला Highway Amenities हा पर्याय दिसेल. इथं क्लिक केल्यास  Medical, Fuel, ATM सह रेस्तराँचा पर्यायही तुम्हाला इथं उपलब्ध होईल.   

6/8

राजमार्ग यात्रा अॅप

rajmarg yatra app national highways authority of india launches app for national highway travel

राजमार्ग यात्रा अॅपमुळं तुम्हाला Fastag recharge, total distance आणि weather report ची माहितीसुद्धा मिळणार आहे.   

7/8

हेल्पलाइन क्रमांक

rajmarg yatra app national highways authority of india launches app for national highway travel

अॅपमध्ये तुम्हाला Emergency helpline 1033 आणि पोलीस हेल्पलाइन क्रमांक 112 ची सुविधा देण्यात आली आहे. ज्या माध्यमातून तुम्ही वेळप्रसंगी अपेक्षित मदतही मिळवू शकता.   

8/8

जियो टॅग

rajmarg yatra app national highways authority of india launches app for national highway travel

अॅपमध्ये असणाऱ्या जियो टॅगमुळं तुम्ही एखाद्या संकटात सापडल्यास या अॅपवरून मदत घेत असताना संबंधित अधिकाऱ्यांना तुमचं अचूक लोकेशन मिळू शकणार आहे.