रजनीकांत यांच्या आयकॉनिक सिगारेट स्टाईलचं बॉलिवूडशी कनेक्शन

दाक्षिणात्य दिग्गज अभिनेता रजनीकांत हे जगातील सगळ्यात मोठ्या सुपरस्टार्सपैकी एक आहेत. रजनीकांत हे दाक्षिणात्य मेगास्टार म्हणून देखील ओळखले जातात. त्यांची अभिनयाची आणि अ‍ॅक्शन स्टाईल प्रेक्षकांना प्रचंड आवडते. 

| Jan 19, 2025, 13:42 PM IST
1/7

74 वर्षांचे आहेत तरी त्यांच्या स्टाईलमुळे ते चर्चेत असतात. रजनीकांत यांचा कोणताही चित्रपट जेव्हा प्रदर्शित होतो तेव्हा सगळीकडे याची चर्चा सुरु होते. इतकंच नाही तर बॉक्स ऑफिसवर हिट ठरतात. त्यानंतर त्यांचे चाहते त्यांची स्टाईल कॉपी करू लागतात. 

2/7

रजनीकांत यांची चष्मा घालण्याची आणि सिगारेट उचलून झेलण्याची स्टाईल लोकांना आवडते. त्यांचा हा अंदाज चाहत्यांमध्ये खूप चर्चेचा विषय ठरतो. इतकंच नाही तर लोकं त्याला 'सिग्नेचर स्टाइल' समजतात. पण सिगारेट उडवण्याची स्टाईल ही रजनीकांत यांची नाही. 

3/7

त्यांनी ही स्टाईल बॉलिवूड अभिनेत्याची कॉपी केली आहे. रजनीकांत हे शत्रुघ्न सिन्हा यांना पाहून ही स्टाईल शिकले होते. रजनीकांत यांनी त्यात थोडा बदल करत स्वत: ची स्टाईल बनवली. 

4/7

रजनीकांत यांनी स्वत: 2018 मध्ये सांगितलं की 'ही स्टाइल शत्रुघ्न सिन्हा यांच्याकडून इन्स्पायर आहे. त्यांनी पाहिलं आणि मग त्यात काही बदल केले आणि प्रेक्षकांना आवडेल अशी स्टाईल बनवली. हे एक आर्ट आहे, पण सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे योग्य टायमिंग.' 

5/7

रजनीकांत यांनी या स्टाईलला आरशासमोर सतत करु लागले. जेणे करून जेव्हा ते ही स्टाईल करतील तेव्हा त्यांना कोणतीही अडचण येणार नाही. रजनीकांत यांनी सांगितलं की फक्त सिगारेट उडवण्यात नाही तर त्यासोबत शूटिंग दरम्यान, त्यांना त्यासोबत डायलॉग देखील बोलावे लागत होते आणि त्यासोबत सिगारेटला योग्य वेळेला पकडणं गरजेचं असतं. 

6/7

रजनीकांत हे लवकरच त्यांच्या 'जेलर 2' मधून पडद्यावर पुनरागमन करणार आहेत. जेलरचा पहिला भाग हा 2023 मध्ये प्रदर्शित झाला आणि त्या चित्रपटानं 343.72 कोटींचं भारतात कलेक्शन केलं. 

7/7

त्यांचा हा चित्रपट प्रेक्षकांच्या इतक्या पसंतीस उतरला की आजही प्रेक्षक जेव्हा हा चित्रपट टिव्हीवर प्रदर्शित होतो तेव्हा पाहण्यासाठी उत्सुक असतात.