कोकणातला प्रसिद्ध सवतकडा धबधबा, पावसाळ्यात पाहायलाच हवा! मुंबई गोवा हायवेपासून जवळच्या अंतरावर
Savatkada Falls: चूनाकोळवन गावापासून जवळच 1 किमीवर निसर्गाच्या सानिध्यात सवतकडा धबधबा आहे. याच धबधब्याच्या बाजूला 3-4 छोटे मोठे धबधबे आहेत. ते धबधबे पाहण्यासाठीसुद्धा अनेक पर्यटक गर्दी करत असतात. सवतकडा धबधब्याजवळचा परिसर हा घनदाट जंगल, उंच सखल भू भाग, हिरवी झाडी, छोटे मोठे पाण्याचे प्रवाह अश्या अनेक जैवविवधतेच्या परिसरात आहे. फोटोग्राफर परेश कांबळी यांनी या धबधब्याचं ड्रोन द्वारे शूटिंग केलंय .
Savatkada Falls: सवतकडा धबधबा जवळपास दीडशे दोनशे फुटावरून कोसळतो. एवढ्या मोठ्या उंचीवरून कोसळणारा धबधबा जणू स्वर्गीय आनंदच देत असतो. सवतकडा धबधब्याच्या चारही बाजूंना हिरवीगार झाडी आपल्याला पाहायला मिळते. येथे आल्यावर तुम्हाला हिरव्यागार निसर्गासोबतच मातीचे रस्ते, पक्ष्यांचा किलबिलाट देखील अनुभवायला मिळेल. फोटोग्राफर परेश कांबळी यांनी या धबधब्याचं ड्रोन द्वारे शूटिंग केलंय .