Bollywood Stars : प्रसिद्ध अभिनेत्याने आईसोबत डान्स केल्याने अफेअरची चर्चा, कोण आहे अभिनेता?

Rahul Roy Life Story :बॉलिवूडमध्ये असे अनेक अभिनेते आहेत, ज्यांचा एकच चित्रपट हिट ठरला आहे, आणि या चित्रपटाने त्यांना मोठं स्टारडम दिलं. या चित्रपटानंतर त्याचे इतर चित्रपट फ्लॉप ठरले आहेत. 

Feb 09, 2023, 20:43 PM IST

Rahul Roy Life Story : बॉलिवूडमध्ये असे अनेक अभिनेते आहेत, ज्यांचा एकच चित्रपट हिट ठरला आहे, आणि या चित्रपटाने त्यांना मोठं स्टारडम दिलं. या चित्रपटानंतर त्याचे इतर चित्रपट फ्लॉप ठरले आहेत. हा अभिनेता दुसरा तिसरा कोणी नसून अभिनेता राहूल रॉय आहे. नेमकी त्याची लाईफ स्टोरी कशी होती, हे फोटो स्टोरीद्वारे जाणून घेऊयात. 

1/5

Rahul roy

सध्या वेलेंटाईन सुरू आहेत.म्हणजेच प्रेमाचा विक सूरू आहे. मात्र 90 च्या दशकात तरुणांना प्रेमात पडायला शिकवणारा अभिनेता राहुल रॉय (Rahul Roy)होता...लांब केस आणि देखणा दिसत असल्यामुळे असंख्य मुली त्याच्या प्रेमात पडायच्या. 

2/5

Rahul roy

1990 मध्ये आलेल्या आशिकी चित्रपटाने त्याला स्टारडम दिले. त्याचा हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर हिट ठरला.साधारण 6 महिने हा शो हाऊसफुल्ल राहिला. त्यामुळे त्यावेळी फक्त दोनच नावं सगळ्यांच्या ओठावर होती, ती म्हणजे राहुल रॉय (Rahul Roy) आणि अनु अग्रवाल.

3/5

Rahul roy

राहुलची (Rahul Roy) लोकप्रियता त्यावेळेस इतकी वाढली होती की, जी कोणतीही अभिनेत्री त्याच्यासोबत दिसायची. तिच्यासोबत त्याचे नाव जोडले जायचे. एकदा तर आईसोबतच्या अफेअरच्या बातम्याही प्रसिद्ध झाल्या होत्या. राहूलने त्याच्या आईसोबत डान्स केला होता,पण राहुल एका मोठ्या महिलेला डेट करत असल्याचे मीडियामध्ये प्रसिद्ध झाले.ही बातमी वाचून राहूल संतापला होता. 

4/5

Rahul roy

इतका मोठा स्टारडम मिळाल्यानंतर राहुल रॉयचे (Rahul Roy) नशीब चमकेल असे सर्वांना वाटले होते. पण उलटेच घडले. राहुल 8 महिने पूर्णपणे बेरोजगार राहिला. त्यानंतर पुन्हा एकदा त्याचे नशीब फिरले आणि त्याला किमान 60 चित्रपटांच्या ऑफर मिळाल्या. हे पाहून राहुल आधी घाबरला पण नंतर त्याने 47 चित्रपट साइन केले.

5/5

Rahul roy

राहुलने (Rahul Roy) घाईघाईने निर्णय घेतला पण तो त्याच्यासाठी चुकीचा ठरला. त्यावेळी तो एका दिवसात 3-3 चित्रपटांची शूटिंग करत असे. इतक्या घाईत त्याने काही चुकीच्या स्क्रिप्टवर स्वाक्षरीही केली जी त्याच्या कारकिर्दीतील सर्वात मोठा चुकीचा निर्णय ठरला.