इशा आणि आकाश अंबानी यांना मागे टाकत बनला नंबर वन! 17 वेळा अपयशी ठरलेला यशस्वी स्टार्टअप किंग

हुरुन इंडिया या संस्थेने जाहीर केलेल्या देशातील करोडपती उद्योजकांच्या यादीत कुणी अव्वल स्थान पटकावले आहे जाणून घेऊया. 

Sep 29, 2024, 22:53 PM IST

ShareChat Founder Ankush Sachdeva : भारतातील अब्जाधीशांची यादी जाहीर करणाऱ्या हुरुन इंडिया या संस्थेने ( Hurun India Under 35 List) प्रथमच देशातील करोडपती उद्योजकांची यादी जाहीर केली आहे. हे सर्व उद्योजक 35 वर्षांपेक्षा कमी वयाचे आहेत. देशातील सर्वात श्रीमंत उद्योजक असलेल्या  मुकेश अंबानी यांचा मुलांना मागे टाकत 17 वेळा अपयशी ठरलेला स्टार्टअप किंगने बाजी मारली आहे. ईशा अंबानी आणि आकाश अंबानी  या यादीत काहीसे पिछाडीवर पडल्याचे दिसत आहे.  

1/7

हुरुन इंडिया या संस्थेच्या यादीत ईशा अंबानी आणि आकाश अंबानी यांच्यासोबत 'ममार्थ'चे संस्थापक गझल अलग आणि फिजिक्सवालाचे संस्थापक अलख पांडे यांचीही नावे आले. मात्र, अंडर 35 लिस्टमध्ये अव्वल स्थानी जी व्यक्ती आहे तिचे नाव ऐकून तुम्ही आश्चर्याचा धक्का बसेल.  

2/7

2018 मध्ये, अंकुश सचदेवा यांना फोर्ब्स 30 अंडर 30 एशियाच्या यादीत स्थान मिळाले होते. हुरुन इंडिया अंडर 35 च्या यादीमध्ये अंकुश सचदेवने मुकेश अंबानी यांची मुले ईशा अंबानी आणि आकाश अंबानी यांना पिछाडी देत अव्वल स्थान पटावले आहे. 

3/7

भानू प्रताप सिंग आणि उरीद अहसान या आपल्या दोन मित्रांसाह त्यांनी  शेअर चॅट लाँच केले. सोशल मीडिया प्लॅटफॉर्म शेअरचॅटचे जगभरात करोडो युजर्स आहेत. गुगल प्ले स्टोअरवर त्याचे 500 दशलक्षहून अधिक डाउनलोड झाले आहेत. टिकटॉकला पर्याय म्हणून त्यांनी मोजो नावाच व्हिडिओ App लाँच केला आहे. अंकुश सचदेवा यांनी 50,0000 कोटींच्या कंपनीचे साम्राज्य उभे केले आहे. 

4/7

व्यवसायात त्यांना तब्बल 17 वेळा अपयश आले. मात्र, त्यांनी हार मानली नाही. अखेरीस 18 व्या प्रयत्नात त्यांना यश गवसले आणि त्यांचे नशिब पालटले.   

5/7

आयआयटीमधून पदवी घेतल्यानंतर अंकुश सचदेवा यांना मायक्रोसॉफ्टसारख्या बड्या कंपनीत नोकरी मिळाली. मात्र, नोकरी सोडून व्यवसायात नशिब आजमवण्याचा निर्णय त्यांनी घेतला.

6/7

17 वेळा अपयशी ठरलेले अंकुश सचदेवा हे देशातील सर्वात यशस्वी स्टार्टअप किंग बनले आहेत.

7/7

 सोशल मीडिया प्लॅटफॉर्म शेअरचॅटचे सीईओ आणि संस्थापक अंकुश सचदेवा यांनी हुरुन इंडियाच्या 2024 वर्षाखालील 35 वर्षांच्या यादीत  अव्वल स्थान पटकावले आहे.