...अन् गोविंदाच्या शर्टने राजकुमार यांनी त्याच्यासमोरच पुसलं नाक; डान्सचीही उडवली खिल्ली

Raaj Kumar Govinda Colourful Shirt: गोविंदा हा त्याच्या डान्ससाठी ओळखला जातो. अगदी सहजपणे डान्स करु शकणाऱ्या मोजक्या अभिनेत्यांमध्ये गोविंदाचा समावेश आजही होतो. मात्र गोविंदाच्या याच कलेला राज कुमार यांनी ट्रोल केलं होतं. इतकेच नाही त्याने दिलेल्या गिफ्टचा त्याच्यासमोरच रुमाल म्हणून वापर केलेला. नेमकं काय घडलेलं जाणून घेऊयात...

| Jul 26, 2024, 15:50 PM IST
1/7

Raaj Kumar Govinda

1987 साली 90 चं दशक गाजवणाऱ्या गोविंदाने राज कुमार यांच्याबबरोबर काम केलं. गोविंदाला राज कुमार यांचं सेटवरील विचित्र वागण्याची काही कल्पना नव्हती.  

2/7

Raaj Kumar Govinda

'मरते दम तक' चित्रपटाचं दिग्दर्शन मेहुल कुमार यांनी केलं होतं. या चित्रपटाच्या सेटवरील गोविदांचा एक रंजक किस्सा मेहुल कुमार यांनी सांगितला.   

3/7

Raaj Kumar Govinda

एकदा सेटवर गोविंदाने रंगेबीरंगी शर्ट घातलं होतं. राज कुमार यांनी त्यावर उपहासात्मक पद्धतीने प्रतिक्रिया नोंदवली. मात्र हे कौतुक नसून टोमणा असल्याचं गोविंदाला कळलं नाही.

4/7

Raaj Kumar Govinda

गोविंदाने राज कुमार यांनी केलेली स्तुती ऐकून त्यांना तो रंगेबीरंगी शर्ट गिफ्ट केला. दुसऱ्याच दिवशी गोविंदाने हे शर्ट राज कुमार यांना दिलं.

5/7

Raaj Kumar Govinda

मात्र राज कुमार यांनी हे शर्ट गोविंदासमोरच आपलं नाक आणि हात पुसायला वापरलं. गोविंदा हे सारं काय सुरु आहे समजलं नाही, असं मेहुल यांनी सांगितलं. हा किस्सा मेहुल यांनी 'बॉलिवूड तनखा'ला दिलेल्या मुलाखतीत सांगितला.

6/7

Raaj Kumar Govinda

राज कुमार यांनी गोविंदाच्या डान्सचीही खिल्ली उडवल्याचं मेहुल यांनी सांगितलं. "मेहुल हा कायम नाचतच असतो," असं त्यांनी मला विचारल्यानंतर मी हसत होतो, असं मेहुल म्हणाले. "तो डान्सर असल्याचं उत्तर मी त्यांना दिलेलं," असं मेहुल म्हणाले.

7/7

Raaj Kumar Govinda

मेहुल यांचा 'मरते दम तक' चित्रपट फारसा चालला नाही. मात्र त्यानंतर 1992 साली प्रदर्शित झालेला तिरंगा आणि नंतर 1994 साली प्रदर्शित झालेला क्रांतीवीर तुफान गाजला.