चुकून बोर्डिंग स्कूलमध्ये जाण्यापासून ते स्तनांच्या शस्त्रक्रियेपर्यंत; शाहरुख खानसोबतच्या अफेयरची झाली 'ती' ही अभिनेत्री कोण?

Priyanka Chopra Birthday : बॉलिवूड, तमिळ आणि आता हॉलिवूड गाजवणारी ही अभिनेत्री शाहरुख खानसोबतच्या अफेयरमुळे खूप चर्चेत आली होती. कधी रंगावरुन तिला हिनवलं गेलं पण आज ती ग्लोबल आयकॉन आहे.

नेहा चौधरी | Jul 18, 2024, 08:57 AM IST
1/10

लहान वयातच करिअरला सुरुवात केल्यानंतर तिला बॉलिवूडमध्ये अनेक अडथळ्यांचा सामना करावा लागला. पण ही देसी गर्ल हताश न होता तिने स्वत:ची ओळख निर्माण केली आणि अनेक वर्ष तिने बॉलिवूडवर राज्य केलं. 

2/10

आम्ही कोणाबद्दल बोलत आहोत तुम्हाला लक्षात आल असेल. प्रियंका चोप्रा हिला कुठल्याही परिचयाची गरज नाही. आई-वडील लष्करात असलेल्या पंजाबी कुटुंबात 18 जुलै 1982 ला जन्म झाला. तिचं शिक्षण कानाकोपऱ्यात फिरुन शिक्षण झालं. पण आई वडिलांच्या कामामुळे तिला परदेशात मावशीकडे जावं लागलं. 

3/10

लहानपणापासूनच अभिनय आणि नृत्याची तिला आवड होती. अमेरिकेत रंगभेदामुळे कसं बसं तिने आपलं शिक्षण पूर्ण केलं आणि तीन वर्षांनी ती भारतात आली. 

4/10

अवघ्या 18 व्या वर्षी मिस वर्ल्डचा किताब जिंकला. त्यानंतर तिला चित्रपटांच्या ऑफर्स येऊ लागल्यात. करिअरच्या सुरुवातीलाच असा काही अनुभव आला की ती डिप्रेशनमध्ये गेली होती. 

5/10

प्रियांकाने 2001 मध्ये पॉलीप काढण्यासाठी नाकाची शस्त्रक्रिया केली होती. दुर्दैवाने शस्त्रक्रिया अयशस्वी झाली आणि अभिनेत्रीच्या नाकाला इजा झाली. एका मुलाखतीत अभिनेत्रीने खुलासा केला होता की, यामुळे ती डिप्रेशनमध्ये गेली होती. नंतर ते दुरुस्त करण्यासाठी त्याने अनेक शस्त्रक्रिया केल्या आणि शेवटी सर्व ठिक झालं. 

6/10

तमिळ चित्रपट थामिझन (2002) आणि बॉलिवूडमधील द हीरो चित्रपटातून करिअरला सुरुवात केली. तुम्हाला जाणून आश्चर्य वाटेल की हमराजमधून तिला काढलं नसतं तर हा चित्रपट तिचा डेब्यू ठरला नसता. हमराजमध्ये अभिनेत्रीला मुख्य नायिकाची भूमिका देण्यात आली होती. निर्मात्यांसोबतच्या तारखेच्या वादातून तिला या चित्रपटातून काढण्यात आले. 

7/10

'प्लॅन', 'किस्मत' आणि 'असंभव' तीन बॅक टू बॅक चित्रपटाने चांगली कमाई केली. ऐतराज ही तिच्या करिअरमधील सर्वोत्कृष्ट चित्रपट ठरला. त्याशिवाय फॅशनसाठीही तिला राष्ट्रीय पुरस्कार मिळाला. मिस वर्ल्डचा किताब जिंकल्यानंतर तिला एका दिग्दर्शकाने स्तनाची शस्त्रक्रिया करण्यास सांगितली होती. 

8/10

लहानपणी ती झोपून टीव्ही पाहत चिप्स खात होती. वडिलांनी तिला चिप्स मागितल्यावर तिने नकार दिला. वडिलांनी अनेक वेळा चिप्सची मागणी केली. तेव्हा ती म्हणाली मी बिझी आहे हे तुला दिसत नाही का? हे ऐकून वडिलांनी तिला शिस्त लावण्यासाठी बोर्डिंग स्कूलला पाठवलं. 

9/10

डॉन 2 च्या वेळी शाहरुख खान आणि प्रियंका एकमेकांना डेट करत होते अशा बातम्या समोर आल्या होत्या. मात्र या दोघींनी या नात्याबद्दल कधीही भाष्य केलं नाही. पण शाहरुख खानचा मित्र विवेक वासवानी याने या नात्याबद्दल खंडन केलं. 

10/10

प्रियांका चोप्रा ही बॉलिवूडमधील सर्वाधिक मानधन घेणारी अभिनेत्री असून 2016 मध्ये देशातील चौथा सर्वोच्च नागरी पुरस्कार पद्मश्री पुरस्कार तिला मिळाला आहे. 2023 च्या अहवालानुसार 620 कोटींची मालमत्ता तिच्या नावावर आहे. ब्रँड एंडोर्समेंट्समधून ती प्रत्येक असाइनमेंटसाठी 5 कोटी घेते. तर हॉलिवूडमधील टीव्ही मालिकांसाठी प्रति एपिसोड 2 कोटी रुपये घेते.