PHOTO: पावसाळ्यात गर्भवती महिलांनी हे पदार्थ टाळावेत? बाळाच्या आरोग्यावर होतो परिणाम

Pregnancy Tips in Monsoon: पावसाळा सुरु झाला की, आरोग्याची विशेष काळजी घ्यावी लागते. अशावेळी गरोदर महिलांनी देखील स्वतःची विशेष काळजी घेणे गरजेचं असतं. या दिवसांमध्ये प्रेग्नेंट महिलांनी काय खावे काय टाळावे?  पावसाळ्यात गर्भवती महिलांनी स्वतःची विशेष काळजी घ्यावी. कारण बदलत्या हवामानात जर तुम्ही काही फास्ट फूड खाल्ले तर त्याचा तुमच्या आरोग्यावर वाईट परिणाम होऊ शकतो. खाण्यापिण्याच्या चुकीच्या सवयींमुळे संसर्ग होऊन गर्भाच्या आरोग्यावर विपरीत परिणाम होत असल्याचेही अनेकवेळा दिसून येते.

1/7

पालेभाज्या

पावसाळ्यात गरोदर महिलांनी हिरव्या पालेभाज्या खाऊ नयेत. आरोग्य तज्ज्ञांच्या मते, पावसाळ्यात पालेभाज्यांमध्ये बॅक्टेरिया आणि बुरशीजन्य वाढीचा धोका वाढतो, ज्याचा गर्भवती महिला आणि तिच्या पोटातील बाळावर नकारात्मक परिणाम होतो.

2/7

चहा आणि कॉफीचा वापर

पावसाळ्यात गरोदर महिलांनी कॉफी आणि चहाचे जास्त सेवन करू नये. कारण चहा-कॉफी जास्त प्रमाणात प्यायल्याने आई आणि गर्भातील मूल दोघांवरही विपरीत परिणाम होतो.  

3/7

ऍपल सायडर व्हिनेगर

गर्भवती महिलांनी पावसाळ्यात सफरचंद सायडर व्हिनेगर पिणे टाळावे. सफरचंद सायडर व्हिनेगरमध्ये जास्त साखर आणि प्रिझर्व्हेटिव्ह्जचा वापर केला जात असल्याने, ते गर्भवती महिला आणि गर्भ या दोघांच्याही आरोग्यासाठी हानिकारक आहे.

4/7

कच्चे दुध

गरोदर महिलांनी पावसाळ्यात मऊ चीज आणि कच्चे दूध खाणे टाळावे. कारण कच्चे दूध आणि मऊ चीज उत्पादनांमध्ये लिस्टेरिया असते ज्यामुळे गर्भावर नकारात्मक परिणाम होतो.  

5/7

अंडी आणि मांस

पावसाळ्यात गर्भवती महिलांनी कच्चे अंडे आणि कमी शिजवलेले मांस खाऊ नये. कारण पावसाळ्यात अंडी आणि मांसासारख्या खाद्यपदार्थांमध्ये हानिकारक बॅक्टेरिया सर्वाधिक वाढतात, ज्याचा गर्भवती महिलेवर खूप वाईट परिणाम होतो. त्यामुळे गर्भवती महिलांनी पावसाळ्यात अंडी आणि मांस खाऊ नये.

6/7

उघड्यावरचे पदार्थ

गरोदरपणा आणि पावसाळा हा दोन्ही काळ चटपटीत खावसं वाटतं. पण याच काळात हे टाळणे गरजेचे असते. कारण पावसाळ्यात उघड्यावरचे पदार्थ खाणे असेही टाळणे गरजेचे आहे. असं असताना गरोदरपणात विशेष काळजी घेणे आवश्यक असते. कारण या दिवसांमध्ये रोगप्रतिकारशक्ती कमी असते. जेव्हा संसर्गजन्य आजार तुम्हाला आजारी पाडू शकतात. 

7/7

काय खाल

या दिवसांमध्ये भरपूर पोषकतत्वाने समृद्ध असलेल्या फळांचा आहार घ्या. तसेच कच्ची, अर्धवट शिजलेले अन्न खाऊ नका. तसेच दुग्धजन्य पदार्थांचा समावेश आहारात करावा. तसेच पावसात कमी पाणी प्यायले जाते अशावेळी हायड्रेट राहणे जास्त गरजेचे असते. तेव्हा ज्यूस, पाणी आणि सूपच्या माध्यमातून शरीरात द्रव पदार्थांचा समावेश वाढवा.