PHOTO : सर्वसामान्य कुटुंबातील मुलगी, वळली अडल्ट क्षेत्राकडे, 12 दिवसात मोडलं लग्न, विचित्र पब्लिसिटी स्टंटमुळे लोक नाराज

Entertainment : सर्वसामान्य कुटुंबात लहानाची मोठी झालेली ही अभिनेत्री मोठेपणे अडल्ट क्षेत्राकडे वळली. तिच्या विचित्र पब्लिसिटी स्टंटमुळे तिने लोकांची नाराजी ओढावून घेतली. एवढंच नाही तर गुगलनेही तिला बॅन केलं होतं.

Mar 11, 2024, 11:48 AM IST
1/10

नवी दिल्लीतील सर्वसामान्य कुटुंबात जन्मलेली ही चिमुकली आज वेगवेगळ्या वादांमुळे कायम चर्चेत असते. ही अभिनेत्री तिच्या कामामुळे नाही तर तिच्या आक्षेपार्ह व्हिडीओ आणि स्टंटमुळे चर्चेत असते. 

2/10

नुकताच तिच्या एका स्टंटमुळे ती मोठ्या अडचणीत सापडली. काही दिवसांपूर्वी तिने आपल्या मृत्यू झाल्याची बातमी पसरवली होती. कॅन्सरबाबत जनजागृती करण्यासाठी तिने हा स्टंट केला होता. आम्ही कोणाबद्दल बोलत आहोत ऐव्हाना तुमच्या लक्षात आलं असेलच. 

3/10

पूनम पांडे तिचा आज वाढदिवस आहे. 2011 मध्ये कॅलेंडर गर्ल्सची मॉडेल म्हणून तिने ओळख निर्माण केली. या इंडस्ट्रीमधील लोकांनी तिला कमी दिवसांमध्ये हिट होण्यासाठी वादग्रस्त गोष्टी करण्याचा सल्ला दिला. 

4/10

कामुक व्हिडीओ बनवून ती सध्या पैसे कमवते. लोक काय म्हणतात यात तिला रस नसून स्वतःच्या अटींवर जगायला पूनमला आवडतं. 

5/10

मृत्यूच्या अफवा नाही तर ती अनेक विचित्र कारणामुळे चर्चेत राहिली. 2011 मध्ये भारत वर्ल्डकप जिंकला तर मी भरमैदानात स्वत:चे कपडे उतरवेल, असं वादग्रस्त विधान केलं होतं. 

6/10

एकदा तिचा बाथरुममधील व्हिडीओ सोशल मीडियावर लीक झाला होता. हा व्हिडीओ तिने लीक केल्याची चर्चा रंगली होती. त्यानंतर यूट्यूबने हा व्हिडीओ ब्लॉक केला होता. 

7/10

तर कोरोना काळात सेफ्टी प्रोटोकॉलचे उल्लंघन केल्याप्रकरणी पूनमला अटकही झाली होती. ती बीचवर बोल्ड फोटोशूट करताना आढळली होती. 

8/10

2020 मध्ये पूनमने सॅम बॉम्बेसोबत लग्न केलं होतं. मात्र गोव्यात हनिमूनला असताना तिने पतीवर हिंसाचाराचा आरोप करत पोलिसांकडे एफआयआर दाखल केला होता. 12 दिवसांमध्ये तिचं हे लग्न मोडलं. 

9/10

  पांडे अॅप हे बोल्ड फोटो आणि व्हिडीओचे तिचे अॅप गुगलने काही तासांमध्येच बॅन केलं होतं. मात्र पूनम मॅग्झिन फोटोशूट आणि मॉडेलिंगमधून भरपूर पैसे मिळवते. एवढंच नाही तर आज 52 कोटी रुपयांची मालकीण असून मुंबईत वांद्र्यामधील पॉश एरियामध्ये स्वतःचे अपार्टमेंट देखील आहे.   

10/10

पूनम एका चित्रपटासाठी तब्बल 1 कोटी मानधन घेते तर तिच्याकडे लक्झरी आणि महागडी BMW 5 सीरीज सेदान कार आहे. दरम्यान 2012 मध्ये तिने आयपीएल टीम केकेआरच्या विजयावर न्यूड फोटोशूट केलं होतं जे वादाच्या भोवऱ्यात अडकलं होतं.