Laxman Jagtap : लक्ष्मण जगताप यांची राजकीय कारकीर्द

Jan 03, 2023, 12:34 PM IST
1/4

पिंपरी-चिंचवडचे भाजप आमदार लक्ष्मण जगताप ( Laxman Jagtap) यांचे दीर्घ आज 3 जानेवारी 2023 रोजी दिर्घ आजाराने निधन झाले आहे. गेल्या काही महिन्यांपासून कॅन्सरशी त्यांचा लढा सुरु होता.  (Maharashtra Political News)  राजकीय कारकीर्द : -  पिंपरी चिंचवड पालिकेतून लक्ष्मण जगताप यांच्या राजकीय कारकीर्दीला सुरुवात केली. 1986 मध्ये ते काँग्रेसचे नगरसेवक म्हणून निवडून आले  पुण्यात पिंपरी चिंचवड महापालिकेतून लक्ष्मण जगताप यांच्या राजकीय कारकीर्दीला सुरुवात झाली.

2/4

1986 साली ते काँग्रेसचे नगरसेवक म्हणून निवडून आले. त्यानंतर 1999 साली शरद पवारांनी राष्ट्रवादी काँग्रेस या पक्षाची स्थापना केल्यानंतर त्यांनी काँग्रेसमधून राष्ट्रवादीत प्रवेश केला.

3/4

लक्ष्मण जगताप यांनी पिंपरी चिंचवडचे महापौर पद त्यांनी भूषवले तर एकदा स्थायी समितीचे अध्यक्षही राहिले.  2004 साली ते विधानपरिषदेचे सदस्य बनले. 2009 मध्ये त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसला राम राम ठोकला. अपक्ष म्हणून काम करण्यास सुरुवात केली.

4/4

2014 मध्ये शेतकरी कामगार पक्षाकडून लोकसभा निवडणूक लढले. शिवसेनेच्या श्रीरंग बारणे यांच्यासमोर त्यांना पराभव पत्करावा लागला. यानंतर लक्ष्मण जगताप यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. 2014 ची विधानसभा निवडणूक लढली आणि ते विजयी झाले आणि त्यानंतरी 2019 मध्येही त्यांनी आमदारकीची निवडणूक जिंकली.